News18 Lokmat

फिफा वर्ल्ड कपमध्ये जर्मनीने उडवला पोर्तुगालचा धुव्वा

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2014 10:03 AM IST

फिफा वर्ल्ड कपमध्ये जर्मनीने उडवला पोर्तुगालचा धुव्वा

muller_third17  जून :  तीनदा फिफा वर्ल्ड कप जिंकणार्‍या जर्मनीने 2014च्या त्यांच्या वर्ल्ड कप प्रवासाची दणक्यात सुरुवात केली आहे. काल रात्री झालेल्या मॅचमध्ये जर्मनीने पोर्तुगालचा 4-0ने धुव्वा उडवला. ही मॅच पाहायला खुद्द जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल हजर होत्या. गेमच्या 12व्या मिनिटाला थॉमस मुलरने पेनल्टी किकचा फायदा करून घेत गोल केला. तर 32व्या मिनिटाला मॅट्स हमेल्सने एक दिमाखदार हेडर मारत गोल केला. पोर्तुगालला आणखी एक धक्का मिळाला 38व्या मिनिटाला जेव्हा जर्मनीच्या मुल्लर आणि पोर्तुगालचा पेपे यांच्यात बाचाबाची झाली आणि पेपेला रेड कार्ड देऊन बाहेर पाठवण्यात आलं. हाफटाइमच्या आधी पुन्हा एकदा मुल्लरनेच गोल नोंदवला. 78व्या मिनिटाला आणखी एक गोल करत मुल्लरने या वर्ल्ड कपमधली पहिली हॅटट्रिक नोंदवली.

अमेरिकेची घानावर मात

काल झालेल्या दुसर्‍या मॅचमध्ये अमेरिकेने बलाढ्य घानाला धक्का देत 2-1ने विजय नोंदवला. वर्ल्ड कपच्या इतिहासातला पाचवा फास्टेट गोल या मॅचमध्ये नोंदवण्यात आला. 32व्या सेकंदाला वॉल्ट्झने अमेरिकेसाठी पहिला गोल नोंदवला पण तगडी टक्कर देत घानाने 82व्या मिनिटाला गोल केला आणि बरोबरी साधली.

घानाचा गोल गंभीरपणे घेत फक्त पाचच मिनिटांत म्हणजे 86व्या मिनिटाला अमेरिकेच्या जॉन ब्रुक्सने गोल केला. अनेक प्रयत्न करूनही घानाला दुसरा गोल करता आला नाही आणि अखेर अमेरिकेने बाजी मारली.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 17, 2014 10:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...