'बाबांचं स्वप्न पूर्ण करणार'

'बाबांचं स्वप्न पूर्ण करणार'

  • Share this:

21pankaja_munde16 जून : माझ्या बाबांनी मला स्वाभिमानाने जगणं शिकवलं, त्यांच्या सावलीत आम्ही लहानेचे मोठे झालो. बाबा..बाबा..म्हणत मी त्यांच्यासोबत राजकारणात आले, संपूर्ण महाराष्ट्र फिरले, कधी कुणाची भीती वाटली नाही. पण आज आम्ही पोरके झालोय. बाबांनी या पंकजाच्या फाटक्या झोळीत इतकी लेकरं टाकली, त्यांची शिकवण कधी विसरणार नाही, मोडेल पण वाकणार नाही त्यांचीही पंकजा त्यांचं स्वप्न पूर्ण करणार अशी शपथ पंकजा पालवे-मुंडे यांनी ओल्या डोळ्यांनी घेतली.

बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांचा चौदावा दिवस आज झाला. त्यावेळी त्यांची कन्या पंकजा मुंडें-पालवेंनी या दु:खाच्या काळात आधार देणार्‍या सर्वांचे आभार मानले. यावेळी पंकजांना अश्रू अनावर झाले. हुंदके देत त्यांनी मुंडेंचा वारसा पुढे नेणार असल्याची ग्वाही दिली.

माझ्या बाबांनी मला स्वाभिमान शिकवलाय. मी मोडेन पण वाकणार नाही, असं त्या यावेळी म्हणाल्या. उतणार नाही, मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडे- पालवे यांनी सर्वांचे आभार मानले. हजारो लोकांच्या उपस्थितीत पंकजा यांनी गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न पूर्ण करण्याची शपथ घेतली.

First published: June 16, 2014, 10:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading