कॅम्पा कोलावरची कारवाई पुढे ढकलली

कॅम्पा कोलावरची कारवाई पुढे ढकलली

  • Share this:

435campa_coala16 जून : मुंबईतील वरळी येथील कॅम्पा कोलाच्या रहिवाशांना तुर्तास दिलासा मिळालाय. कॅम्पा कोलावर उद्या (मंगळवारी) होणारी कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही कारवाई 20 जूननंतर होण्याची शक्यता आहे अशी माहिती पालिकेचे आयुक्त सिताराम कुंटे यांनी दिली.

कॅम्पा कोलाच्या रहिवाशांना घरं खाली करण्याची मुदत संपल्यानंतर मुंबई पालिकेनं कारवाई करण्याची नोटीस बजावली होती. मात्र आपल्याला हक्काचं घरं सोडावं लागत असल्यामुळे हतबल झालेल्या एका रहिवाशाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. विनोद कोठारी असं व्यक्तीचं नाव आहे.

विनोद कोठारी यांचं रविवारी निधन झालं त्यांच्यावर उद्या (मंगळवारी) अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यामुळे कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे.

First published: June 16, 2014, 10:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading