मुंबईत दर्याला उधाण, मरीन ड्राईव्हच्या समुद्रात बुडून 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबईत दर्याला उधाण, मरीन ड्राईव्हच्या समुद्रात बुडून 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

  • Share this:

ÃÖÆüÃÖ¾ÖÖêÝÖ ÃÖ¦ü»Öê¦ü¦ü»Ö

15  जून : मुंबईतल्या मरीन ड्राईव्हला 14 वर्षाच्या एका तरूणाचा आज समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे.त्याच्या एकाला मित्राला वाचवण्यात पोलिसांना यश आलं असून अतीउत्साहीपणामुळे ही घटना घडल्याची माहिती आहे.

मुंबईत गुरुवारी अरबी सुद्राला मोठी भरती आली होती. ती अजूनही कायम आहे. आजही दर्या असाचं खवळले असणार आहे. मुंबईच्या समुद्रात दुपारी दोन वाजून तीन मिनिटांनी 4 पूर्णांक 85 मीटरची भरती आली. या वर्षातली मुंबईतली ही आतापर्यंतची सर्वात मोठी भरती आहे. रविवार असल्यानं मुंबईकरांनी ही भरती अनुभवन्यासाठी मोठी गर्दी केली होती. मुंबईकरांना समुद्राच्या जवळ न जाण्याचा आणि सावधानतेचा इशारा बीएमसीनं दिला आहे.

दरम्यान,  गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची सर्वचजण आतुरतेनं वाट पाहत होते तो मान्सून अखेर मुंबईत दाखल झाला आहे. मान्सूनचं मुंबईत आगमन झाल्याचं कुलाबा हवामान खात्यानं अधिकृतपणे जाहीर केलं आहे. आतापर्यंत कुलाब्यात 22 मिमी आणि सांताक्रूझमध्ये 13 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना या गोड बातमीमुळे दिलासा मिळाला आहे. महापालिकेची मात्र अजूनही तारांबळ उडालेली आहे. कारण नालेसफाईचे अजूनही तीनतेराचं वाजले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 15, 2014 11:48 AM IST

ताज्या बातम्या