अहवाल स्वीकारला, अजित पवारांना वाचवण्याचा प्रयत्न?

अहवाल स्वीकारला, अजित पवारांना वाचवण्याचा प्रयत्न?

  • Share this:

ajit_pawar_chitale_samiti

14 जून : सिंचन घोटाळ्या प्रकरणी चितळे समितीचा अहवाल राज्य मंंत्रिमंडळाने अखेर स्वीकारला आहे. कृती अहवालात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतोय. विधिमंडळात 15 पानी कृती अहवाल मांडला जाणार आहे. याअगोदर राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला.

चितळे समितीच्या मूळ अहवालाच्या सीडींचंही वाटप केलं जाणार आहे. दरम्यान, या मुद्द्यावरुन विरोधकांनी विधानसभेत चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूबही करण्यात आलं.सिंचन घोटाळ्यावरची चर्चा दडपण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गृहमंत्री आर.आर.पाटील यांचं भाषण राजकीय आहे. सिंचन घोटाळ्याप्रकरणी सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

शुक्रवारी विधानसभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळ्यावरचा चितळे समितीचा अहवाल फोडला. गेल्या दहा वर्षांत शून्य पूर्णांक 1 टक्क्यापेक्षाही कमी सिंचन झालं, असा गंभीर निष्कर्ष या अहवालात काढण्यात आल्याचा दावा फडणवीस यांनी केला. अहवालात प्रकल्पांच्या अनियमिततेसाठी अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात आलंय.

तर विदर्भ सिंचन विकास मंडळाच्या प्रकल्पांतल्या अनियमिततेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जबाबदार धरण्यात आलंय. पण, त्यांच्याबाबत निर्णय सरकारने घ्यावा, असंही या अहवालात नमूद करण्यात आलंय. अधिकार्‍यांवर मात्र विभागीय चौकशी करुन कठोर कारवाई करावी, अशी शिफारस करण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2014 05:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading