News18 Lokmat

सावधान, आज समुद्र आणखी खवळला !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2014 08:30 PM IST

सावधान, आज समुद्र आणखी खवळला !

454high tide mumbai14 जून : गेल्या दोन दिवसापासून मुंबईच्या समुद्रकिनार्‍यावर लाटांनी तांडव घातले आहे. ताशी 50 किलोमीटरपेक्षाही जास्त वेगाने वाहणार्‍या वार्‍यामुळे मुंबईतील समुद्र किनार्‍यावर जोरदार सागरी लाटा धडकत आहेत.

 

आज या लाटांचा वेग आणखीनचं वाढणार असून दुपारी 4.76 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा समुद्र किनारी धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. समुद्रकिनारी फिरायला जाणार्‍या नागरिकांनी सावधान राहावं असं आवाहन करण्यात आलंय. या लाटांमुळे मुंबईतील समुद्र किनार्‍यावर असणार्‍या भागात पाणी शिरत असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोर जावं लागतंय.

 

मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे अरबी समुद्रात 'नानौक' चक्रीवादळ तयार झाले. हे वादळ ओमानच्या किनारपट्टीजवळ सरकल्यामुळे धोका टळलाय पण जाता जाता या वादळाचा तडाखा मुंबईच्या समुद्रकिनार्‍यांना बसलाय. गेल्या दोन दिवसापासुन वाहणार्‍या जोरदार वार्‍यामुळे मुंबईच्या समुद्र किनार्‍यावर जोरदार सागरी लाटा धडकत आहेत. येणार्‍या काही दिवसांत हीच परिस्थिती राहणार असून त्यासाठी प्रशासनानं आपली तयारी पूर्ण केली आहे.

Loading...

नेमकी काय तयारी ?

- या दिवसांमध्ये नागरिकांनी समुद्रावर जावू नये यासाठी प्रशासनातर्फे विशेष काळजी घेण्यात येत आहे

- गेट वे ऑफ इंडिया येथे 15 सुरक्षा रक्षक सकाळी 10 ते 6 यावेळेत तैनात करण्यात आले आहेत

- गिरगाव, दादर, जुहू , वर्सोवा, गोराई याठिकाणी अग्निशामक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत

- सर्व सबंधित विभागाच्या आयुक्तांना सहाय्यक आयुक्तांना सर्व मदत यंत्रणा तयार ठेवण्याचे आदेश

- समुद्रात 4.5मीटर पेक्षा जास्त उंचीच्या लाटा येण्याची शक्यता

- यावेळी 14 मुख्य आणीबाणी यंत्रणा कायम तयार

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 14, 2014 04:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...