जीवघेणी भरती, आणखी एका तरुणाचा मृत्यू

जीवघेणी भरती, आणखी एका तरुणाचा मृत्यू

  • Share this:

444police_bharti14 जून : पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मैदानात उतरलेल्या तरुणांवर काळाने झडप घात: पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मैदानात उतरलेल्या तरुणांवर काळाने झडप घातलीय. पोलीस भरतीचा आणखी एक बळी गेलाय.

 

राहुल सपकाळ या तरुणाचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसापासून तो उपचारासाठी फोर्टीज रुगणालयात दाखल होता. त्याचं बिल 1 लाख 30 हजार रुपये आलंय.

 

हे पैसे भरले नाहीत म्हणून मृतदेहही त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात दिला जात नाहीय. आतापर्यंत पोलीस भरतीत चार जणांचा मृत्यू झालाय. राज्यभरातील पोलीस भरतीची प्रक्रिया तरुणांसाठी अत्यंत खडतर बनली आहे.

मुंबईत पोलीस भरतीदरम्यान भोवळ येऊन खाली पडलेल्या नाशिकच्या विशाल केदारेचा मुलुंडच्या प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. विशाल केदारे हा नाशिकचा रहिवासी होता. याआधी अंबादास सोनावणे याचाही पोलिस भरती दरम्यान मृत्यू झाला होता. नाशिकमधल्या मालेगावचा रहिवासी अंबादास भरती परीक्षेमध्ये धावताना कोसळला. नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्येही पटनी ग्राउंडवर धावताना कोसळलेल्या विरारच्या प्रसाद माळीचा मृत्यू ओढवला.

पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न घेऊन आलेल्या राज्यभरातल्या तरुणांना प्रचंड गैरसोयींना सामोरं जावं लागतंय. रखरखत्या उन्हात परीक्षा देणार्‍या या तरुणांच्या खाण्या-पिण्यासाठी कुठलीच सोय करण्यात आलेली नाही. त्यांना फूटपाथवर झोपावं लागतंय. पोलीस विभागानं मात्र याकडे सोयीस्करपणे डोळेझाक केलीय. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे पोलीस भरतीदरम्यान कुणाचा मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी आपली नाही, असे पोस्टर्स पोलीस खात्याने लावले आहेत.

नागपूरमध्येही उन्हातान्हात पोलीस भरती सुरू आहे. या परीक्षेत धावताना सांगलीचा सुनील येळे हा तरुण भोवळ येऊन पडला. तो सांगलीच्या आटपाडी तालुक्यातून नागपूरला आला होता. सुनीलला नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलंय आणि तो सध्या कोमात आहे. सुनीलच्या कुटुंबीयांवर मोठं संकट कोसळलंय.

पोलीस भरतीदरम्यान झालेल्या या दुर्घटनांसाठी विरोधकांनी सरकारला जबाबदार धरलंय. उन्हाळ्याच्या दिवसांत पोलीस भरती करण्याचा निर्णय कुणी घेतला याची चौकशी करा, अशी मागणी भाजपचे नेते विनोद तावडे यांनी केलीय.

राज्यभरात पोलीस भरतीमध्ये पाच जणांचा मृत्यू ओढवलाय पण अजूनही अशा दुर्घटना घडू नयेत याची कोणतीच खबरदारी घेतली जात नाही.

First published: June 14, 2014, 12:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading