'छम छम' बंदच, नियम तोडल्यास 3 वर्षं कारावास

'छम छम' बंदच, नियम तोडल्यास 3 वर्षं कारावास

  • Share this:

535658dance_bar13 जून : राज्यात अखेर छम छम कायमसाठी बंद करण्यात आली आहेत. आज शुक्रवारी विधानसभेत डान्सबार बंदी विधेयक मंजूर करण्यात आलंय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत ही घोषणा केली.

राज्यात डान्सबार वरची बंदी कायम ठेवण्याचा निर्णय गुरुवारीच घेण्यात आला होता. याबद्दलच्या विधेयकाच्या आराखड्याला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली होती. या मंजुरीमुळे आता फाईव्हस्टार हॉटेलसह राज्यातल्या सर्व हॉटेल्समध्ये नव्याने डान्सबार बंदी घालण्यात येणार आहे. त्यासंबंधीच्या विधेयकाच्या आराखड्याला बुधवारी राज्यमंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

2005 मध्ये राज्यसरकारने डान्सबारबंदी लागू केली होती पण हा कायदा भेदभाव करणारा असल्याचं स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने तो रद्द केला होता. पण तरीही राज्य सरकारने डान्सबार बंदीवर ठाम निर्णय घेतला. जुन्या कायद्यातल्या त्रुटी दूर करून नवा कायदा करण्यात येतोय.

त्यानुसार रेस्टॉरंट, परमिट रुम आणि बिअर बारमध्ये डान्सला सरसकट बंदी घालण्यात आली आहे. त्याचा भंग करणार्‍यास 3 वर्षं कारावास आणि हॉटेलचा परवाना रद्द करण्याची शिक्षा देण्यात येईल.

First published: June 13, 2014, 9:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading