स्पेन आणि हॉलंडमध्ये काटे की टक्कर !

स्पेन आणि हॉलंडमध्ये काटे की टक्कर !

  • Share this:

spain vs holland13 जून : आज वर्ल्ड कपमध्ये एक धमाका बघायला मिळणार आहे. 2010 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये एकमेकांना भिडलेल्या दोन टीम्स आमने सामने येणार आहेत. आज या मॅचमध्ये ग्रुप बीमध्ये गतविजेत्या स्पेनला आव्हान आहे ते हॉलंडचं. सॅल्व्हेडोरमधील अरिना फॉन्टे नोव्हावर भारतीय वेळेनुसार रात्री 12.30 वाजता ही मॅच रंगेल. त्यामुळे आज चपळता, आक्रमकता आणि एक्साईटमेंटनं भरलेली तुफान मॅच बघायला मिळणार आहे.

4 वर्षांपूर्वी या दोन टीम्स वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी आमने सामने होत्या. स्पेनच्या आर्मीला आव्हान होतं ते ऑरेंज आर्मीचं.. आपल्या पहिल्या वर्ल्ड कप जेतेपदासाठी या दोघांची झुंज होती. पण अखेर आँद्रेस इनिएस्टानं स्पेनसाठी ती किमया केली तर हॉलंडला पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.

पण आज रात्री हॉलंडला वचपा काढण्याची एक नामी संधी आहे. ल्युई व्हॅन गाल यांनी हॉलंडच्या टीमचा चेहरा बदलला. 5-3-2 या नवीन फॉर्मेशनमध्ये खेळणारी ही हॉलंडची टीम स्पेनसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते पण ही हॉलंडची टीम तशी तरुण आहे. त्यामुळे रॉबीन व्हॅन पर्सी, आर्जेन रॉबीन आणि वेस्ली स्नाईडरवर या टीमची संपूर्ण मदार असेल.

पण हॉलंडचा मुकाबला वर्ल्ड कप जेतेपदाच्या प्रबळ दावेदार स्पेनशी आहे हेही विसरून चालणार नाही. विंसेंट डेल बॉस्कच्या 'टीकी-टाका' स्ट्रेटेजीच्या जोरावर स्पेननं याअगोदरच 3 मोठ्या स्पर्धांत जेतेपद पटकावलंय. त्यामुळे या मॅचमध्ये काय नवीन स्ट्रेटेजी स्पेन वापरतंय याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. डिएगो कोस्टाच्या रुपानं स्पेनला वाईल्ड कार्ड मिळालंय.त्यामुळे कोस्टाचा स्पेन कसा नेमका वापर करतं हे बघणंही उत्सुकतेचं ठरेल.

त्यामुळे आजची मॅच ही क्लॅश ऑफ द टायटन्स अशीच असणार आहे. तर ग्रुपमध्ये चिलीचं आव्हानंही या दोन टीम्सना पेलावं लागणार आहे. म्हणूनच पहिली मॅच जिंकत कोण आघाडी घेतंय याचा परिणाम नॉक आऊट राऊंडवरही होणार हे नक्की.

First published: June 13, 2014, 9:46 PM IST

ताज्या बातम्या