Elec-widget

मराठा समाजाला 20 टक्के आरक्षण, 21 जूनला घोषणा ?

मराठा समाजाला 20 टक्के आरक्षण, 21 जूनला घोषणा ?

  • Share this:

3maratha_aarakashan13 जून : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसलीय. मराठा समाजाला 20 टक्के आरक्षण देण्यास सरकार अनुकूल आहे. यासंबंधीचा निर्णय आज अपेक्षित आहे.

मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेत याविषयीची माहिती दिली. मराठा आरक्षणासंबधी विनायक मेटे यांनी यासंबंधी प्रश्न विचारला होता. मात्र हे आरक्षण देत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण दिलं जाणार आहे.

याबाबत 21 जूनला निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर घोषणा अपेक्षित आहे. दरम्यान, मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर उतरेल का याबद्दल शंका आहे, असं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी म्हटलंय. तर मराठा आरक्षणाची घोषणा आधीच व्हायला हवी होती असं मेटे म्हणाले आहेत.

Loading...

छावाच्या कार्यकर्त्यांनी वाहनांची हवा सोडली

मात्र दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावा संघटनेनं नांदेडमध्ये आंदोलन केलं. एसटी बसेसच्या टायरची हवा सोडून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा दिल्या. नांदेड -नागपूर महामार्गावर आज (शुक्रवारी) दुपारी अचानक 10 ते 15 कार्यकर्त्यांनी एसटी बसेस अडवल्या प्रवाशांना खाली उतरवून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत टायरची हवा सोडली 3 ते 4 बसेसच्या टायरची हवा सोडून कार्यकर्ते पसार झाले.

 

या आंदोलनामुळे बसेस मधल्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. मुख्य महामार्ग आणि आसनापुलावर बसेसची हवा सोडली. या मार्गावर वाहतुक विस्कळीत झाली होती. पोलिसांना देखील या आंदोलनाची माहिती नव्हती अशा पद्धतीने आंदोलन करुन सामान्यांना वेठीस धरण्यात आलं.

 

तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी छावा संघटनेने प्रदेशाध्यक्ष भीमराव मराठे यांच्यासह कार्यकर्त्यांनी एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे वाहन अडवून हवा काढ आंदोलन केलं. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून 30 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2014 02:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com