छम छम बंदच, सुधारीत विधेयक आज सादर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 13, 2014 01:21 PM IST

mumbai_dance_bar_13 जून : फाईव्हस्टार हॉटेलसह राज्यातल्या सर्व हॉटेल्समध्ये नव्याने डान्सबार बंदी घालण्यात येणार आहे. त्यासंबंधीच्या विधेयकाच्या आराखड्याला बुधवारी राज्यमंत्रिमंडळाने मंजुरी दिली. आज (शुक्रवारी) यासंबंधीचं सुधारीत विधेयक विधानसभेत मांडण्यात येणार आहे.

2005 मध्ये राज्यसरकारनेडान्सबारबंदी लागू केली होती पण हा कायदा भेदभाव करणारा असल्याचं स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने तो रद्द केला होता. पण तरीही राज्यसरकार डान्सबार बंदीवर ठाम आहे.

जुन्या कायद्यातल्या त्रुटी दूर करून नवा कायदा करण्यात येतोय. त्यानुसार रेस्टॉरंट, परमिट रूम आणि बिअर बारमध्ये डान्सला सरसकट बंदी घालण्यात आली आहे. त्याचा भंग करणार्‍यास 3 वर्षं कारावास आणि हॉटेलचा परवाना रद्द करण्याची शिक्षा देण्यात येईल.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2014 01:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...