केपटाऊनमध्ये जोशात निघाली आयपीएलची शोभायात्रा

17 एप्रिल, केपटाऊनरंगीबेरंगी कपडे तसंच मुखवटे घालून सजलेली माणसं... संगीताच्या तालावर ठेका धरणारे क्रिकेटर्स... आणि केपटाऊन मधल्या जनेतचं स्वागत स्वीकारताना त्यांच्याशी हस्तांदोलन करणारे आयपीएल टीमचे मालक... असं आयपीएच्या जोशात निघालेल्या शोभायात्रेचं दर्शन भारतीय प्रमाण वेळेनुसार काल उशीरा संध्याकाळी पहायला मिळालं. येत्या शनिवारपासून इंडियन प्रीमिअर लीगच्या दुस-या सत्राला सुरुवात होत आहे. त्या आधी वातावरण निर्मिती करण्याकरिता या स्पर्धेत सहभागी झालेल्या आठ संघांची जंगी मिरवणूक केपटाऊन शहरात निघाली. राजस्थान रॉयल्स संघाची शिल्पा शेट्टी आणि कोलकाता नाइट रायडर्सचा शाहरूख खान अशी स्टार मंडळी या शोभायात्रेच्या मिरवणुकीचं आकर्षण होते. केपटाऊन मधल्या क्रिकेटप्रेमी जनतेनं आयपीएलसाठी दक्षिण आफ्रिकेत दाखल झालेल्या आठ संघांचं जल्लोषात स्वागत केलं.गेल्या काही दिवसांपासून सुरक्षाव्यवस्थेमुळे वादाच्या भोव-यात सापडलेल्या आयपीएलच्या धूमला दक्षिण आफ्रिकेत 18 एप्रिलपासून सुरुवात होत आहे आणि त्यासाठीच दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊनमध्ये आयपीएल कार्निव्हल म्हणजेच शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. आयपीएलमधील सहभागी आठही टीमच्या खेळाडूंनी या शोभायात्रेमध्ये भाग घेतला होता. आयपीएलचे संचालक ललित मोदींसह फ्रँचाईजीचे मालकही यामध्ये सहभागी झाले होते. एकीकडे मुंबई इंडियन्स आता आयपीएलसाठी सज्ज असताना दुसरीकडे सचिन कुठे असा प्रश्न पडला होता. तर सचिन तेंडूलकरही काल पहाटे दक्षिण आफ्रिकेला रवाना झालाय. मुंबई इंडियन्स यावेळी सर्वोत्तम कामगिरी करेल अशी आशा यावेळी सचिनने व्यक्त केली. मुंबई इंडियन्सला दक्षिण आफ्रिकेचा माजी ऑलराऊंडर शॉन पोलॉक टीमला कोचिंग देणारेय. तर झहीर खान टीममध्ये परतल्यामुळे बॉलिंग अटॅकही भक्कम झाली आहे. सचिन तेंडूलकर जवळजवळ एका वर्षांनंतर टी-20 क्रिकेट खेळणारेय. भारतासाठी टी-20 क्रिकेट आपण खेळणार नसल्याचं त्याने आधिच जाहीर केलं होतं.यावेळी टीमचे नवे कोच प्रवीण आमरे टीमबरोबर आहेत. गेल्यावर्षी केलेल्या चुका पुन्हा होऊ नयेत याची काळजी टीमला घ्यावी लागणार आहे. आयपीएलचे संचालक ललित मोदी आणि कोलकाता टीमचा मालक शाहरुख खान परवा रात्री उशिरा दक्षिण आफ्रिकेत दाखल झाले. आयपीएल भारताबाहेर हलवण्याचा निर्णय मागच्या महिन्यातला सगळ्यात कठीण निर्णय होता, असं ललित मोदी यांनी यावेळी बोलून दाखवलं. पण दक्षिण आफ्रिकेतल्या स्पर्धेच्या तयारीबद्दल शाहरुख खानने समाधान व्यक्त केलं आहे. ' आयपीएल स्पर्धा भारताबाहेर हलवणं हा माझ्यासाठी सर्वात कठीण निर्णय होता. पण दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेत स्पर्धा आयोजित करण्याचा अनुभवही तेवढाच चांगलाय. सगळ्यांचाच पाठिंबा खूप चांगला मिळालाय.आयपीएलसाठी हजारो संख्येंने लोक दक्षिण आफ्रिकेत आलेत. या सगळ्यांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून दक्षिण आफ्रिकेचे आम्ही आभारी आहोत, ' असं ललिम मोदी म्हणाले. ' इतक्या कमी वेळेत सगळं काही व्यवस्थीत आयोजित होईल, असं मला वाटलं नव्हतं. पण एवढ्या कमी वेळेत एवढी चांगली सुविधा पुरवल्याबद्दल आम्ही सगळे फ्रँचाईजी दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाचे आभारी आहोत, ' असं शाहरूख खान म्हणाला.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2009 05:49 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2009 05:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...