मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 11, 2014 08:38 PM IST

मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

4233modi11 जून : 16 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी पहिल्यादाच भाषण केलं. चाळीस मिनिटांच्या भाषणात मोदींनी महिला सुरक्षा, विकास, उद्योग, गुजरात मॉडेल, शेती, दलित, मागासवर्गीय या सर्व विषयांवर परखड मत व्यक्त केलं तसंच विरोधकांवरही शेलक्या शब्दात टीका केली.

नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

 • राष्ट्रपतींच्या अभिभाषणात जी आश्वासनं दिली, ती पूर्ण करण्याचं वचन या संसदेला देतो – मोदी
 • अनेक वर्षांनी देशानं स्थिर सरकारसाठी मतदान केलं, हा एक शुभसंकेत – मोदी
 • Loading...

 • लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणार -नरेंद्र मोदी
 • जगाच्या पाठीवर आपण एक मोठी लोकशाही शक्ती – नरेंद्र मोदी
 • सगळ्या अडचणीतून देशाला एक सामर्थ्यवान देश बनण्याची हीच वेळ -मोदी
 • जगासमोर आपण ताठ मानेनं चाललं पाहिजे -मोदी
 • सरकार हे गरीबांसाठी असावं, गरीबांसाठी काम केलं नाही तर जनता आम्हाला माफ करणार नाही -मोदी
 • श्रींमंत आपल्या मुलांसाठी उत्तमोत्तम शिक्षण देऊ शकतात, गरीबांनी काय करावं ? -मोदी
 • गरीबांचं ऐकणं आणि त्यांच्यासाठी जगणं ही सरकारची जबाबदारी – मोदी
 • आम्ही गांधी , लोहिया मालवियांच्या विचारधारेच्या त्रिसूत्रीचा वापर आवश्यक -मोदी
 • गरीबांना दारिद्र्यातून बाहेर काढणं गरजेचं -मोदी
 • सन्मान आणि अभिमानानं जगणं हा गरीबांचा स्वभाव -मोदी
 • गरीबांना दारिद्र्यातून बाहेर आणणं हे काम -मोदी
 • तळागाळातल्या लोकांसाठी यंत्रणेनं काम करावं -मोदी
 • गरीबांना दारिद्र्याशी लढण्याचं बळ द्यावं -मोदी
 • शेतकर्‍यांचं जीवनमान बदलण्यासाठी प्रयत्न करू -मोदी
 • गावातही उत्तमोत्तम शिक्षण मिळावं -मोदी
 • दूरशिक्षणाच्या , सॅटेलाईटच्या माध्यमातून गरीबांच्या मुलांचं शिक्षण व्हावं -मोदी
 • गावांमध्ये उद्योगधंदे सुरू व्हावेत -मोदी
 • शेतीवर आधारीत उद्योग निर्माण व्हावेत -मोदी
 • ऑरगॅनिक वस्तूंचं मार्केट आपण काबज केलं पाहिजे -मोदी
 • शिक्षण हेच गरिबी नष्ट करण्याचं प्रभावी माध्यम -नरेंद्र मोदी
 • गुजरातमधलं सॉईल हेल्थ कार्डचा प्रयोग देशभरात केला पाहिजे -मोदी
 • छोट्या प्रायोगिक उपायांनी बदल घडू शकतो -मोदी
 • देशातील गरीब जनता उपाशी राहू नये ही सर्वांची जबाबदारी -मोदी
 • अन्नधान्याच्या किमती कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू -नरेंद्र मोदी
 • चलनवाढीचा दर नियंत्रणात आणण्याचा आमचा प्रयत्न -मोदी
 • माहिती तंत्रज्ञानामध्ये भारत अग्रेसर पण शेती उत्पादनांची माहिती अनुपलब्ध हे दुदैर्व -मोदी
 • चलनवाढीचा दर नियंत्रणात आणण्याचा आमचा प्रयत्न -मोदी
 • अन्नधान्याच्या किमती कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू – मोदी
 • डाळींमधला प्रथिनांचा अंश वाढवण्यासाठी प्रयोग आवश्यक -मोदी
 • गेल्या काही दिवसात बलात्काराच्या घटना घडल्यात हिमाचलमधील दुर्घटना आपण आत्मचिंतन केल पाहिजे -मोदी
 • बलात्कार सारख्या विषयांवर राजकारण करणं शोभादायक नाही -मोदी
 • महिलेचा सन्मान , सुरक्षा ही आपली प्राथमिकता असलीच पाहिजे -मोदी
 • बेजबाबदार विधान करणं थांबवा -मोदी
 • कष्टकर्‍याचा सन्मान झाला पाहिजे -मोदी
 • दादा धर्माधिकारींच्या पुस्तकातल्या उतार्‍याचा मोदींनी केला उल्लेख
 • जगण्यासाठी कौशल्य आवश्यक केवळ प्रमाणपत्र नाही -मोदी
 • नव्या धाडसी निर्णयांची गरज -मोदी
 • देशाला सामर्थ्यशाली बनवण्यासाठी योग्य उपायांची गरज
 • दलित, पीडित, शोषित, आदिवासींच्या आयुष्यात स्वातंत्र्यांनतरही बदल आलेला नाही -मोदी
 • मागास घटकांच्या आयुष्यात बदल घडावा -मोदी
 • देशाला विकासाची नवी परिभाषा गरजेची -मोदी
 • नव्या धाडसी निर्णयांची गरज -मोदी
 • समाजाच्या सर्व घटकांचं सबलीकरण आणि सर्व समाजघटकांना सोबत घेणं आवश्यक -मोदी
 • महात्मा गांधींकडून प्रेरणा घेणं हे आपलं कर्तव्य -मोदी
 • विकासाचं जनआंदोलन आपण उभारलं पाहिजे -मोदी
 • देशात सुराज्याचं आंदोलन आवश्यक -मोदी
 • देशातल्या प्रत्येक कुटुंबाला निवारा, पाणी अशा मूलभत गोष्टी मिळाव्यात याचे नियोजन व्हावं -मोदी
 • स्वप्न पाहावीत, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा अडचणी आल्या तर ज्येष्ठांचा अनुभव आहेच
 • गुजरात मॉडेलच नाही तर देशात जिथे कुठे चांगलं काम झालं त्याचा आम्ही स्वीकार करू -मोदी
 • सगळ्यांनी एकत्र देशाचा विकास केला पाहिजे-मोदी
 •  टीकेचा वापर मी सूचना म्हणून करेन,आरोप वाईट असतात टीका वाईट नसते -मोदी
 • नियमांच्या बाहेर माझं भाषण झालं असल्यास मला क्षमा करावी -नरेंद्र मोदी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2014 05:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...