30 विद्यार्थिनींच्या विनयभंगप्रकरणी प्रोफेसरवर अखेर गुन्हा दाखल

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 10, 2014 09:57 PM IST

30 विद्यार्थिनींच्या विनयभंगप्रकरणी प्रोफेसरवर अखेर गुन्हा दाखल

mumbai gang rape

10  जून : कळव्याच्या राजीव गांधी मेडिकल कॉलेजमधील विनयभंग प्रकरणी आरोपी प्राध्यापक डॉक्टर शैलेश्वर नटराजनच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. शैलेश्वर नटराजनवर 30 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. कळवा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, यासाठी खुद्द वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कळवा पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता.

कळव्यातल्या राजीव गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एका प्रोफेसरनं जवळपास 30 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना उघड झाली. याप्रकरणाची विद्यार्थिनींनी मेलद्वारे ठाणे पोलिसांकडे तक्रार केली आहे. यानंतर हॉस्पिटल प्रशासन आणि कळवा पोलिसांनी 2 वेगवेगळ्या चौकशी समिती स्थापन करून या गुन्ह्याचा तपास सुरू केला.

आतापर्यंत 30 विद्यार्थिनींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तसंच प्राध्यापक शैलेश्वर नटराजन याला निलंबित करण्यात आलं आहे. पण, प्राध्यापकाला अजून अटक झालेली नाही. या प्रकरणी आतापर्यंत कारवाई का केली नाही, असा जाब काँग्रेस नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी कॉलेजचे डीन सी. मैत्रा यांना विचारला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात येते आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2014 05:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...