वंचित आघाडीच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा, मिळाली एवढी रक्कम

वंचित आघाडीच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा, मिळाली एवढी रक्कम

सत्ताधारी भाजप-शिवसेना सूडबुद्धीतून अशी कारवाई करत आहे, असंही वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

  • Share this:

मुंबई, 10 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. अशातच आयकर विभागाने वंचित बहुजन आघाडीचे चांदिवली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अबुल हसन खान यांच्या कार्यालयावर छापा टाकला आहे.

वंचितचे उमेदवार अबुल हसन खान यांच्या साकीनाका कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला. या छाप्यात आयकर विभागाला 1 हजार 100 रुपये आढळून आले. त्यानंतर आयकर विभागाने दिवसभर आमच्या कार्यकर्त्यांची चौकशी केली, असा आरोप वंचित आघाडीकडून करण्यात आला आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेना सूडबुद्धीतून अशी कारवाई करत आहे, असंही वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. याबाबत 'लोकमत'ने वृत्त दिलं आहे.

विधानसभा निवडणूक आणि वंचितची वाटचाल

विधानसभा निवडणुकीआधी वंचित बहुजन आघाडीमध्ये जागावाटपावरून वाद झाला. त्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडी या निवडणुकीत स्वबळावर लढत आहे.

'गेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने वंचित आघाडीला मतदान केले नाही. 'एमआयएम'सोबत (MIM)युती तुटली तरी त्याचा वंचित आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही,' अशी प्रतिक्रिया एमयाएमने साथ सोडल्यानंतर 'वंचित'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून तो एमआयएमला सुद्धा आहे, अशा शब्दात एमआयएमला पुढील वाटचालीसाठी प्रकाश आंबडकरांनी शुभेच्छाही दिल्या होत्या.

'लोकसभा निवडणुकीनंतर मुस्लिम समाजाचा आत्मविश्वास वाढल्याने तो आमच्यासोबत आहे. त्यामुळे विधानसभेच्या 25 जागा मुस्लिम समाजातील उमेदवारांना देणार,' अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली होती.

VIDEO: 'राजीनामा द्यायला जिगर लागतं'; उदयनराजेंकडून विरोधकांचा समाचार

Published by: Akshay Shitole
First published: October 10, 2019, 12:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading