S M L

सुषमा स्वराज आणि वांग यी यांच्या सीमाप्रश्नावर चर्चा

Samruddha Bhambure | Updated On: Jun 8, 2014 07:42 PM IST

सुषमा स्वराज आणि वांग यी यांच्या सीमाप्रश्नावर चर्चा

08  जून :   चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि सुषमा स्वराज यांच्यात आज बैठक झाली. मोदी सरकार स्थापनेनंतर ही भारत आणि चीन यांच्या दरम्यान ही पहिलीच उच्चस्तरीय बैठक आहे. या बैठकीत भारत-चीन सीमावादावर तसंच मानसरोवर यात्रा या महत्त्वाच्या मुद्‌दयांवर चर्चा झाली. या वर्षी भारत आणि चीन मध्ये सुमारे सहा बैठकांच्या शक्यतेबाबतही आज चर्चा झाली. राष्ट्रपती, उप. राष्ट्रपती, पंतप्रधान या तीनही पातळीवर होणार्‍या बैठकांबाबत यावर चर्चा झाली.

नवीन सरकारसोबत राजनैतिक संबंध निर्माण करुन दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वांग ई हे दोन दिवसाच्या भारत दौर्‍यावर आले आहेत. ते उद्याभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटणार आहेत.

चीन, भारताशी आणि नव्या सरकारशी आर्थिक संबंध वाढवण्यास उत्सुक असल्याचं चीनकडून सांगण्यात आलं. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर तिबेट समर्थकांनी दिल्लीमध्ये घोषणाबाजी केली. भारत-चीन सीमावाद, व्हिसा या मुद्द्यांबद्दल या बैठकीत काही ठोस चर्चा व्हावी अशी दोन्ही देशांची इच्छा आहे.

Loading...

दरम्यान, देशाचे आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यासाठी आता मोदी सरकारचे अधिक प्रयत्न सुरू झालेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या महिन्याच्या शेवटी बांगलादेश दौर्‍यावर जातील. परराष्ट्रमंत्री म्हणून सुषमा स्वराज यांची ही पहिलीच परदेश वारी असेल. त्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीन यांची भेट घेतील.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 8, 2014 07:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close