नारायण राणेंना भाजपात प्रवेश नाही- एकनाथ खडसे

नारायण राणेंना भाजपात प्रवेश नाही- एकनाथ खडसे

  • Share this:

khadse - rane

07 जून :  काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले उदयोगमंत्री नारायण राणे यांनी भाजपात येण्याबाबत कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. तसेच राणे यांनी असा कोणताही प्रस्ताव दिला तरी भाजप याबाबत कसलाही विचार करणार नाही असे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. राणे लवकरच काँग्रेसला राम राम करून भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याबाबत पत्रकारांनी खडसे यांना छेडले असता  राणेंच्या संभाव्य भाजप प्रवेशाला विरोध असल्याचे स्पष्ट उत्तर दिले आहे.

एकीकडे पक्षश्रेष्ठीचं दुर्लक्ष आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी राणेंना पूर्णपणे बेदखल केलंय. त्यामुळे सिंधुदुर्ग काँग्रेसच्या माध्यमातून नारायण राणे मुख्यमंत्री आणि काँग्रेस श्रेष्ठींवर दबाव आणू पाहतायत. त्यातच राणे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली. पत्रकारांनीही भाजपच्या सर्व नेत्यांकडे याबाबत विचारणा सुरु केली. त्यामुळे खडसे यांनी आज याबाबत खुलासा करून राणे यांनी भाजपात येण्याबाबत कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. तसेच तसा त्यांचा प्रस्ताव आला तरी त्याबाबत विचार होण्याची कोणतेही शक्यता नसल्याचे सांगत राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2014 02:31 PM IST

ताज्या बातम्या