महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

  • Share this:

mumbai gang rape05 जून :  लोकल ट्रेनमधल्या महिलांची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. आज सकाळी मिरा रोड स्टेशनवर चालत्या लोकल ट्रेनमध्ये एका तरुणीच्या अंगावरील दागिने खेचून आणि मारहाण करून चोरटा पसार झाला आहे. भाईंदरमध्ये राहणार्‍या अपूर्वा चक्रवर्तीने आज सकाळी 4.55 वाजता चर्चगेट लोकल पकडली. अपूर्वा महिलांच्या डब्यात एकटीच होती. लोकल मिरा रोड स्टेशनवर येताच एक अज्ञात इसम डब्यात शिरला. लोकल सुरू होताच चोरटा अपूर्वाच्या अंगावरील चेन हिसकावत असताना त्याला विरोध केला. त्यावेळी चोरट्याने प्रथम अपूर्वाला मारहाण केली. त्यानंतर हातोड्याने मारहाण करून तिच्या गळ्यातील चेन, पायातले पैंजण आणि हातातल्या बांगड्या घेऊन दहिसर रेल्वे स्टेशनवरून अगदी आरामात चोरटा पसार झाला.

यात अपूर्वा जखमी झाली असून तिच्यावर कांदिवलीतल्या जनशताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार करून संध्याकाळी घरी सोडण्यात आलं. या आधीही 22 मार्च रोजी नालासोपार्‍यात लोकलमध्ये घुसून एका महिलेची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आजपर्यंत कोणताच तपास लागला नाही. मात्र अशा वाढत्या घटनांमुळे महिलांच्या डब्यातून प्रवास करणार्‍या महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

कल्याणहून पनवेलच्या दिशेने जाणार्‍या एसटीमध्ये क्षुल्लक वादातून एका प्रवाशाने महिला कंडक्टर दीपमाला सोनावणे यांना मारहाण केल्याची घटना काल घडली. पीडित महिलेची मदत करण्यास गेलेल्या दुसर्‍या महिला कंडक्टरलाही या माथेफिरू प्रवाशाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत या महिला जखमी झाल्या, त्यांचे कपडेही फाटले होते. दरम्यान या प्रकरणी आज महिला आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी या महिलेची अंबरनाथमधील छाया रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2014 02:27 PM IST

ताज्या बातम्या