निवडणुकीच्या नावानं चांगभलं ; घोषणांचा पाऊस,योजनांची खैरात

निवडणुकीच्या नावानं चांगभलं ; घोषणांचा पाऊस,योजनांची खैरात

 • Share this:

pawar ajit5 जून : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर आघाडी सरकारने विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी अखेरचा प्रयत्न म्हणून जनतेला खूश करण्याचा प्रयत्न केला. आघाडी सरकारने आज शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प आज सादर केला. अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. चालू वर्षात 1 लाख 80 हजार 320 कोटी महसूल जमा तर 1 लाख 84 हजार कोटी महसूल खर्च देणारा असा एकूण 4,103 कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात कोणताही ठोस, निर्णायक निर्णय न जाहीर करता शेवट कडूच केला.

राज्यात 400 नव्या प्रकल्पांना मान्यता, रस्ते विकासासाठी 2 हजार 836 कोटी रुपये निधी, विजेसाठी 26 लाख नवीन वीज जोडण्या आणि गारपीटग्रस्त शेतकर्‍यांसाठी योग्यवेळी मदत पुरवू न शकल्याची ग्वाही देत 2 हजार 350 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.

तसंच बळीराजासाठी कर्जमाफी तर देण्यात आली नाही मात्र कर्जफेडीसाठी डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली. शेतकर्‍यांसाठी नवी कृषी संजीवनी योजना आणि कापसावरील कर दोन टक्के करण्याचा प्रस्ताव ही मांडण्यात आला. मात्र शेतकर्‍यांसाठी कोणतीही ठोस घोषणा यात करण्यात आली नाही. राज्याच्या औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र नंबर वन असल्याचा दावा पवारांनी केला. परकीय गुंतवणुकीचा वाटा 18 टक्के असून परकीय गुंतणूक आकर्षित करण्यात राज्य सर्वोत्तम असल्याचं पवारांनी सांगितलं. त्याचबरोबर देशातील उत्पन्नात राज्याचा वाटा 14.93 टक्के आहे असंही ते म्हणाले. विशेष म्हणजे अलीकडे राज्याचा औद्योगिक अहवाल सादर झाला यात महाराष्ट्र पिछाडीवर असल्याचं स्पष्ट करण्यात आलं पण तरीही पवारांनी राज्य नंबर वन असल्याचा दावाच करुन टाकला.

तर महिलांच्या सबलीकरणासाठी राज्यात महत्त्वाची शहरं बिनतारी शहर जोडणी आणि हलकी वाहनं उपलब्ध करुन देणं, गतीमंद व्यक्तींच्या व्यवसाय कर माफ, पोहे, फुटाण्यावरचा कर माफ, ऍट्रोसिटी खटल्यांसाठी 6 फास्ट ट्रॅक कोर्ट, महिला अत्याचाराच्या प्रकरणासाठी 25 विशेष न्यायालय स्थापन करणार असल्याच्या महत्वाचा घोषणाही करण्यात आल्यात. बजेट सादर करण्याच्या भाषणात अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार सत्तापन केल्याबद्दल अभिनंदन केलं.

अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे -

 • व्यवसाय कर विलंब शुल्क माफी
 • ऐशआराम कर सवलतीची मर्यादा 750 वरुन 1000 रु.
 • ऊस खरेदी करात माफी
 • मतिमंद व्यक्तींना व्यवसाय करात सुट
 • व्यवसाय कराच्या मर्यादेच वाढ,मर्यादा 5 हजारावरुन 7 हजार रु.
 • कापसावरील 2 टक्के कर माफ
 • डाळ आणि फुटाण्यांवरील 5 टक्के कर माफ
 • आंतरराज्यात विक्री होण्यार्‍या तंबाखूवर करमाफी
 • वीज वितरण व्यवस्थेत 6 हजार 500 कोटींची गुंतवणूक
 • 26 लाख नवीन ग्राहकांना वीजजोडणी
 • MIDC मध्ये 24 तास वीज
 • शेतकर्‍यांना वीज बील भरणा कऱण्यासाठी नवीन कृषी संजीवनी योजना सुरू करणार
 • रस्ते विकासासाठी 2 हजार 836 कोटी रु. निधी मंजूर
 • नक्षलग्रस्त गोंदिया आणि गडचिरोलीसाठी 800 कोटी रुपयांच्या रस्ते कामांना मंजुरी
 • सिमेंट नाला बांधण्यासाठी 261 कोटी रुपये
 • रक्तपेढया बळकट करण्यासाठी जीवनअमृत सेवा योजना सुरु केलीय.
 • महिलांच्या सुरक्षाव्यवस्था बळकट कऱण्यासाठी 25 जलदगती न्यायालय स्थापन
 • महिलांना तात्काळ मदत मिळण्यासाठी वायरलेससह हलकी वाहने उपलब्ध कऱणार
 • अल्प संख्यांक विकासासाठी 362 कोटी रुपये
 • अनुसुचित जाती वस्ती सुधारणा 900 कोटी रुपये
 • रमाई आवास योजनेच अनुदान 70 हजारावरुन 1 लाख रु कऱणार
 • अनुसुचित जातींच अन्याय निवारण्यासाठी विभाग स्तरावर 6 विशेष न्यायालय
 • छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी 100 कोटींची करतूद
 • मराठी भाषा संवर्धनासाठी 80 कोटी 20 लाखाच्या आराखड्याला मंजुरी

First published: June 5, 2014, 4:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading