मुंडेंच्या मृत्यूची CBI चौकशी करा, परळीकरांचा मंत्र्यांच्या गाड्यांना घेराव

मुंडेंच्या मृत्यूची CBI चौकशी करा, परळीकरांचा मंत्र्यांच्या गाड्यांना घेराव

  • Share this:

4564parli04 जून : आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिल्यानंतर कार्यकर्त्यांचा भावनाचा बांध फुटला. गोपीनाथ मुंडेंना अखेरचा निरोप देऊन परतत असताना सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, गृहमंत्री आर.आर.पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा परळीकरांनी अडवला.

परळीकरांनी हर्षवर्धन पाटील, आर.आर.पाटील, छगन भुजबळ यांच्या गाड्याला घेराव घातला, मुंडेंच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा अशी मागणी परळीकरांनी केली. मुंडेंच्या गाडीला ज्या पद्धतीने अपघात झाला तो घातपात होता त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा अशी मागणी परळीकरांनी केली. तिन्ही मंत्र्यांनी परळीकरांनी समजूत काढली मात्र परळीकर आपल्या मागण्यावर ठाम राहिले अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करुन मंत्र्यांच्या ताफ्याला घेरावातून वाट मोकळी करुन दिली.

तर दुसरीकडे रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी मुंडेंच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा अशी मागणी पुन्हा एकदा केली. रामदास आठवलेंपाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केलीय.

दरम्यान, पंकजा मुंडेंनी या दगडफेकीच्या चौकशीची मागणी केलीय.

आज भाजपाचे नेते आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराच्या वेळी लाखो लोक महाराष्ट्रातून आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचं पाहण्यासाठी त्यांना निरोप देण्यासाठी आले होते. यावेळी जमावातून काही अप्रिय घटना घडल्या. काही जणांना याचा त्रास झाला. याबद्दल मी खेद व्यक्त करते. दगडफेक करणारे हात हे मला अथवा मुंडे साहेबांना यांना मानणारा असूच शकत नाही. ही दगडफेक झाली याची चौकशी करण्यात यावी अशी माझी मागणी असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्याकडे मागणी करणार आहे. या अंत्यसंस्कारासाठी अनेक ठिकाणाहून लोक आले होते म्हणून याचा शोध घेण्यात यावा.

First published: June 4, 2014, 3:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading