04 जून : भाजपचे नेते आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडेंचं अंत्यदर्शन घेण्यासाठी परळीमध्ये जनसागर लोटला आहे. मुंडेंचं पार्थिव थोड्यावेळापूर्वीच वैद्यनाथ साखर कारखान्याच्या परिसरात आणण्यात आलंय.
मात्र गेल्या दोन दिवसांपासून आपल्या लाडक्या नेत्यांच्या दर्शनासाठी अधीर झालेल्या कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या. अंत्यदर्शनाच्या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. त्यातच चाहते आणि कार्यकर्ते लाडक्या नेत्याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अधीर झाले होते, त्यामुळे काही वेळ गोंधळ झाला.
भाजप नेते पाशा पटेल आणि प्रकाश जावडेकर यांनी या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे-पालवे यांनाच त्यासाठी पुढाकार घ्यावा लागला.
शांत राहा, पोलिसांना सहकार्य करा, साहेबांच्या सन्मान राखा असं भावनिक आवाहन पंकजा पालवे यांना करावं लागलं. आवाहन करताना पंकजा मुंडे यांना अश्रू अनावर झाले होते. कार्यकर्त्यांचा अश्रूंचा बांध फुटला परत या परत या मुंडे साहेब परत या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. अत्यंत भावूक अशा वातावरण्यात परळीकरांनी आपल्या लाडक्या नेत्यांला निरोप देण्यासाठी जमा होत आहे. ठिकठिकाणाहून लोकं वैद्यनाथच्या प्रांगणात दाखल होतं आहे.
Follow @ibnlokmattv |