बीड पोरका झाला...

बीड पोरका झाला...

  • Share this:

parli_munde_beed03 जून : बीड म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि गोपीनाथ मुंडे म्हणजे बीड...असं समीकरण तयार झालंय. गोपीनाथ मुंडे यांच्या झंझावात कारकिर्दीमुळे बीडचं नावं देशभर पोहचलं. कुठले तुम्ही, 'बीडचे' असं कुणी उत्तर दिलं तर आपसूक गोपीनाथ मुंडे यांचं नाव आलंच. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे बीडवर शोककळा पसरली आहे. लोकसभा निवडणुकीत मुंडेंनी प्रचंड मताधिक्यांनी निवडून आले. त्यांच्या विजयाची आज भव्य रॅली आयोजित करण्यात आली पण सकाळी मुंडे यांच्या निधनाची बातमी धडकताच कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोकाचं चुकाला.

बीडमधल्या गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजपचे कार्यकर्ते जमा झाले. या कार्यालयासमोर अक्षरक्ष: शोककळा पसरली असून कार्यकर्त्यांना रडू आवरत नाहीये. दुखद म्हणजे ज्या ठिकाणी मुंडेंचा नागरी सत्कार होचा त्याच ठिकाणी त्यांचा अंत्यसंस्कार केला जाणार आहे. परळी सारख्या छोट्याशा गावात 12 डिसेंबर 1949 रोजी मुंडेंचा जन्म झाला. परळी ते दिल्ली गाठून दाखवण्याची किमया मुंडेंनी करुन दाखवली. मुंडे यांनी महाराष्ट्र विधानसभेत पाच वेळा आमदार राहिले आहेत. 1992-1995 - विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी भुषावलं. तसंच 1995 ते 2000 मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होण्याचा बहुमानही त्यांना मिळाला.

तर दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले. 15 व्या लोकसभेत मुंडे उपनेते होते. अलीकडेच झालेल्या निवडणुकीत त् बीड मतदारसंघातून विक्रमी मतानं ते विजयी झाले आणि त्यांना ग्रामविकास मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. मला मिळालेलं खात्यामुळे मी खुश असून महाराष्ट्रासाठी खूप काम करायचंय आहे अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिली होती. बीडचा चेहरा असलेले गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे गड आला आणि सिंह गेला अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. उद्या सकाळी 7 वाजता पार्थिव लातूरमध्ये पोहोचणार आहे. तर उद्या संध्याकाळी परळीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

First published: June 3, 2014, 12:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading