26 /11च्या वृत्तांकनासाठी मीडियाला पेन आणण्यास बंदी

15 एप्रिल, मुंबई सुधाकर कांबळे मुंबईत 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणाच्या खटल्याला आजपासून सुरुवात होत आहे. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून कोर्टात पत्रकारांना वृत्तांकनासाठी पेन देखील न्यायला बंदी करण्यात आली आहे. पोलीस स्वत: पत्रकारांना पेन पुरवणार आहेत. स्वत: विकत घेतलेलं पेन न्यायलायात वापरायला बंदी आणणारा हाकसाबचा पहिलाच खटला आहे. त्यामुळे संपूर्ण मीडिया कसाबच्या खटल्याकडे ऐतिहासिक खटला म्हणून पाहात आहे. एरव्ही मुंबईतील हायकोर्ट,सेशन कोर्ट तसंच इतर कोर्टात बातम्या गोळा करण्यासाठी पत्रकार जायचे, तेव्हा तिथं कोणती ही बंधनं नव्हती. पण कसाबचा हा खटलाचं असा आहे, की सर्व काही नव्या पद्धतीने होत आहे. याचाच एक भाग म्हणजे पत्रकारांना पेनचा मज्जाव. कारण या पेनचाच वापर कडून अनेक वस्तू बनवल्या गेल्यात.पत्रकारांकडे अनेक प्रकारचे छुपे कॅमेरे असतात. हे कॅमेरे पेनमध्येही असतात. आणि त्यांचीच धास्ती पोलिसांनी घेतली आहे. दुसरं म्हणजे पेन पिस्तुल. पेनच्या साईजमध्ये हे पिस्तुल असतं. कसाबच्या जीवाला धोका आहे. एखादा व्यक्ती पेन पिस्तुल आणून घातपात करू शकतो, अशी ही पोलिसांनी भीती आहे. त्यामुळेच पोलीस खबरदारी घेत आहेत.1993 बॉम्बस्फोटाचा खटला ज्या टाडा कोर्टात चालला त्या टाडा कोर्टात मोबाईल न्यायला बंदी होती. पण स्पेशल कोर्टात प्रथमच इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत पेनवरही बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोर्टाच्या आवारात मुख्य दरवाजा पासून सुमारे सहा मेटल डिटेक्टर असणार आहेत. सर्व ठिकाणी तपासणी केली जाणार आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2009 05:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading