विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात

  • Share this:

virodhi2 जून : महाराष्ट्राच्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशनाला काहीशी वादळी सुरुवात झाली. विरोधकांनी लोकसभेच्या विजयाचा जल्लोष साजरा करत अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आगमन केले. लोकसभा निवडणुकीतल्या यशानं उत्साहात असलेल्या विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे पहिल्याच दिवशी आक्रमक भूमिका स्वीकारली. भगवे फेटे आणि ढोल-ताशांच्या गजरात शिवसेना आणि भाजप आमदारांनी जल्लोष केला.

सरकराचे हे अखेरचे अधिवेशन असून, ऑक्‍टोबरनंतर महायुतीचे सरकार राज्यात येणार असल्याचा दावा करत विरोधकांनी पहिला दिवस गाजवला. विधानसभेत विरोधकांनी उद्योगमंत्री नारायण राणेंना घेरलं. रोहा खाडी पाण्याखालून पाईपलाईन प्रश्नावरून एकनाथ खडसे आणि नारायण राणे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. नारायण राणेंना विरोधकांनी घेरण्याची ही पहिलीच वेळ आहे.

यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहून सत्ताधारी व विरोधी आमदारांनी उभे राहून परस्परविरोधी घोषणाबाजी केली. त्यामुळे अखेर प्रश्न राखून ठेवावा लागला. त्याआधी कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायर्‍यांवर बसून घोषणाबाजी केली.

दरम्यान, आज सकाळी साडेनऊ वाजता अब्दुल सत्तार यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची आणि अमित देशमुख यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2014 05:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...