पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून होणार सुरु

  • Share this:

rajya mnatri mandal2 जून :  महाराष्ट्रातील पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या दणदणीत यशानंतर महायुतीचे आमदार या अधिवेशनामध्ये आक्रमक असणार आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार काहीसे 'बॅक-फूट'वर असतील, हे उघड आहे.  दोन आठवडे चालणार्‍या या अधिवेशनात, येत्या 5 जूनला राज्याच्या सुमारे 45 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला जाणारं आहे. विशेष म्हणजे हे अधिवेशन 12 व्या विधानसभेचे शेवटचे अधिवेशन असणार आहे.

लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानं खचलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीची या अधिवेशनात कसोटी लागणार आहे. त्यामुळे या शेवटच्या अधिवेशनात सत्ताधार्‍यांकडून अनेक लोकप्रिय आणि महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, हे स्पष्ट दिसतं आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था, चितळे-केळकर समित्यांचे अहवाल, दलितांवरील अत्याचार, भ्रष्टाचाराने माखलेले मंत्री या मुद्यांवर अधिवेशनादरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडण्याची देखिल शक्यता आहे.

First Published: Jun 2, 2014 09:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading