कोलकाता दुसर्‍यांदा चॅम्पियन

  • Share this:

345kkr1 जून : अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या थरारक मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने पंजाबवर मात करत दुसर्‍यांदा चॅम्पियन होण्याचा मान पटकावला आहे. पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहचलेल्या पंजाबला मात्र चॅम्पियनपदापासून हुलकावणी मिळाली. बंगळुरमध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएलच्या सातव्या हंगामाची आज सांगता झाली.

कोलकाताला 200 धावांचा टार्गेट होते ते कोलकाताने 20 व्या ओव्हरमध्ये 7 विकेट देऊन पूर्ण केलं. कोलकाताकडून मनीष पांडेने सर्वाधिक 94 रन्स करुन टीमच्या विजयाच्या पायाभरणी केली. मनीषने 50 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकार लावून विजयाचा भार हलका केला. ऑरेंज कॅपचा दावेदार रॉबिन उथप्पा या मॅचमध्ये 5 रन्सवर आऊट झाला. कप्तान गौतम गंभीरने 23 रन्स करुन आऊट झाला तर युसूफ पठाणने 36 रन्सची खेळी पेश केली.

कोलकाताने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगची संधी दिली. पंजाबने चांगली सुरुवात केली पण ओपनिंगला आलेला विरेंद्र सेहवाग 7 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर वोहराने टीमची बाजू सांभाळत अर्धशतक पूर्ण केलं तर ग्लैन मॅक्सवेलच्या खराब फार्म लक्षात घेता कप्तान जॉर्ज बेले तिसर्‍या क्रमाकांवर उतरला पण 30 रन्सवर पव्हेलियनमध्ये परतला. पंजाब इलेव्हन्सने निर्धारीत 20 ओव्हरमध्ये 199 रन्सचा टप्पा गाठला. कोलकाताने अखेरच्या ओव्हरपर्यंत झुंज देत दुसर्‍यांदा चॅम्पियन होण्याचा मान पटकावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2014 12:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading