S M L

जळगाव रेल्वे प्रवासी अपघात प्रकरणी टीसी साळुंखेंना जामीन

Sachin Salve | Updated On: May 30, 2014 07:34 PM IST

जळगाव रेल्वे प्रवासी अपघात प्रकरणी टीसी साळुंखेंना जामीन

30 मे : जळगाव रेल्वे स्थानकावर महिला मृत्युप्रकरणी अटकेत असलेले टीसी संपत साळुंखे यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. गुरुवारी उज्ज्वला पंड्या या महिलेचा रेल्वे पकडताना अपघात झाला यात पंड्या यांचा मृत्यू झाला. मात्र पंड्यांचा मृत्यू टीसीनेच ढकलून दिल्याने झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला होता. नातेवाईकांच्या तक्रारीवरुन टीसी संपत साळुंखे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर दुसरीकडे, धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात उज्ज्वला पंड्या या पडल्या, त्यांना साळुंखे यांनी ढकललं नाही असं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलंय. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजवरूनही हे स्पष्ट होतं, अस पत्रक रेल्वे प्रशासनाने प्रसिद्द केलंय. या प्रकरणी पोलीस अधिक तपास सुरू आहे.

पस्तीस वर्षांच्या उज्ज्वला पंड्या यांचा काल जळगाव रेल्वे स्टेशनवर गाडीखाली चिरडून मृत्यू झाला. टीसी संपत साळुंखे यांनी त्यांना ढकलल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार नातलगांनी केली होती. उज्ज्वला यांच्या मृत्युला जबाबदार धरून लोकांनी टीसी साळुंखे यांना बेदाम मारहाणही केली होती. अखेरीस पोलिसांनी त्यांना अटक केल्यावर उज्ज्वलाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मात्र, धावत्या गाडीत चढताना उज्ज्वलाचा अपघाती मृत्यू झाल्याचं रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे. तर या प्रकरणाची एकच बाजू दाखवली गेल्याचं साळुंखे यांच्या नातेवाईकांचंच म्हणणं आहे उज्ज्जवला पंड्या मृत्यू प्रकरणी टीसी संपत साळुंखे यांचा दोष नसल्याचं रेल्वे प्रशासनाने पत्रक काढून स्पष्ट केलंय. साळुंखे यांनी पंड्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला असंही रेल्वे प्रशासनाने सांगितलंय. या अपघाताच्या वेळचं सीसीटीव्ही फुटेज रेल्वे प्रशासनाने कोर्टात सादर केलं. त्यानुसार साळुंखे यांना जामीन मंजूर करण्यात आला. त्यामुळे साळुंखे यांना थोडा दिलासा मिळालाय.संपत साळुंखे या प्रकरणात निर्दोष आहेत की नाही, हे लवकरच सिद्ध होईल. पण या निमित्ताने प्लॅटफॉर्म आणि ट्रेन यांच्यामधल्या गॅपचा मुद्दा समोर आलाय. आता या समस्येवर नेमकी उपाययोजना कधी होणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 30, 2014 04:29 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close