'कनगरा प्रकरणी ऍट्रोसिटीचे गुन्हे दाखल करा'

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 29, 2014 11:09 PM IST

'कनगरा प्रकरणी ऍट्रोसिटीचे गुन्हे दाखल करा'

f644bala_nandgaonkar29 मे : उस्मानाबादमधील कनगरा इथे काही दिवसांपूर्वी झालेल्या पोलीस गावकरी मारहाण प्रकरणाची चौकशी ही विधिमंडळ समस्या समिती मार्फत करावी अशी मागणी मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी कनगरा इथे पोलीस आणि गावकर्‍यांमध्ये हाणामारी झाली होती, ज्यात पोलिसांनी गावकर्‍यांवर जोरदार लाठीमार केला होता. यात दोषी असणार्‍या अधिकार्‍यांवर ऍट्रोसिटीचे गुन्हे दाखल करुन त्यांना तत्काळ सेवेतून कायमचे काढून टाका अशी मागणी त्यांनी केली.

 

बाळा नांदगावकर यांनी आज कनगरा गावात जावून गावकर्‍यांनाशी संवाद साधला. पोलिसांनी गावकर्‍यांना ज्या प्रकारे मारहाण केली ती अतिशय माणुसकीला काळिमा फासणारी आहे. यात दोषी असणार्‍या अधिकार्‍यांवर ऍट्रोसिटीचे गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ सेवेतून कायमचे काढून टाका अशी मागणी त्यांनी केली आहे. राष्ट्रवादीने जे आज मंत्रिमंडाळात बदल केले आहेत त्यावर बाळा नांदगावकर यांनी टीका केली.

 

नुसते मुखवटे बदलन्याने त्याचा चेहेरे बदलणार नाहीत. 'जो बुदसे गयी वो हौद से नही आती' अशी टीका बाळा नांदगावकर यांनी केली आहे. शरद पवार यांनी लोकसभेत पराभव झाला त्यानंतर 18 तास काम करणार आहे. सगळया कार्यकर्त्यानी सुद्धा प्रामाणिक काम करावे त्यांनी जरी केले पुरेसे आहे अशी बोचरी टीकाही नांदगावकर यांनी केली.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 29, 2014 10:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...