News18 Lokmat

अमेरिकेकडून पायघड्या, मोदींसोबत काम करायचंय !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 28, 2014 01:30 PM IST

अमेरिकेकडून पायघड्या, मोदींसोबत काम करायचंय !

v42usa_obama

28 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरचा 9 वर्षांचा बहिष्कार संपवण्याच्या दृष्टीने अमेरिकेनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. मोदी यांच्यासोबत काम करण्यास अमेरिका उत्सुक असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी सांगितलंय. भारताचे अमेरिकेतले राजदूत एस जयशंकर यांनी जॉन केरी यांची भेट घेतली. त्यावेळी केरी यांनी त्यांच्याकडे ही बाब स्पष्ट केली.

नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी प्रथमच वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदींचं अभिनंदनही केलं. तसंच या अगोदर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवले त्यानंतर लगेल अमेरिका सरकारने मोदींबद्दल भूमिका मवाळ केली.

खुद्द अध्यक्ष बराक ओबामा यांनी मोदींना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. एवढंच नाहीतर मोदींना आमंत्रणही दिलंय. आता मोदींना ए वन व्हिसा मिळण्याची शक्यता आहे. गुजरात दंगली प्रकरणामुळे अमेरिकेनं मोदींना व्हिसा देण्यास नकार दिला होता. अ

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2014 12:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...