मोदींच्या शपथविधीला शरीफ येणार; शिवसेनेची कोंडी?

मोदींच्या शपथविधीला शरीफ येणार; शिवसेनेची कोंडी?

  • Share this:

navaz uddhav modi25 मे : देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी म्हणजेचं उद्या होणार्‍या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ उपस्थित राहणार असल्यानं शिवसेनेची कोंडी झाली आहे.

शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याबाबत निर्णय उद्धव ठाकरे आज रात्री मुंबईत होणार्‍या बैठकीत घेण्याची शक्यता आहे. मोदींच्या शपथविधीला जगभरातील आठ देशप्रमुखांसह तीन हजार मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मोदींनी नवाज शरीफ यांना दिलेले आमंत्रण स्वीकारत ते भारत भेटीवर येत आहे. या भेटीदरम्यान द्विपक्षीय चर्चाही होणार आहे.

पाकिस्तानशी कुठलीही चर्चा करू नये तर जशास तसे उत्तर द्यावे ही सेनेची आजवरची भूमिका असल्याने शरीफ यांच्या समोर सेनेच्या मंत्र्यांनी शपथ घेतली तर महाराष्ट्रात टीकेला तोंड द्यावं लागेल असं शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणण आहे. मोदींना प्रत्यक्ष विरोध करता येणे शक्य नसल्यामुळे मंत्रीपदासाठी अद्याप यादी अंतिम झाली नसल्याचे कारण देत शपथविधीला गैरहजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सेनेचे मंत्री मंत्रिमंडळात विस्ताराच्या वेळी सामील होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. शपथविधीला उध्दव ठाकरे यांनाही निमंत्रण असून तेहजर राहणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्षं लागलं आहे.

First published: May 25, 2014, 12:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading