सोलापुरात आ.दिलीप मानेंच्या पुतळ्याचं दहन

सोलापुरात आ.दिलीप मानेंच्या पुतळ्याचं दहन

  • Share this:

66solapur_mane24 मे : सोलापुरात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या पराभवाचं खापर परस्परांच्या माथ्यावर फोडण्यावरुन काँग्रेसतंर्गत वाद उफाळून आलाय. शुक्रवारी चिंतन बैठकीतल्या तोडफोडीनंतर आज नई जिंदगी चौकात आमदार दिलीप मानेंच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशाराही मुस्लिमांनी दिला आहे.

 

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काल मुंबईत झालेल्या बैठकीत शिंदेंच्या पराभवाची कारणं देताना आमदार दिलीप माने यांनी मुस्लिमांनी काँग्रेसला मत दिली नाहीत. असं मत मांडलं होतं. मानेंच्या या वक्तव्याचे सोलापुरात पडसाद उमटले.

 

शिंदेंच्या पराभवाला मुस्लिमांना जबाबदार धरण्यात येत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी मुस्लीम बहुल नई जिंदगी चौकात आमदार मानेंच्या पुतळ्याचं दहन केलं. त्यानंतर काँग्रेसच्या मुस्लीम पदाधिकार्‍यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला.

First published: May 24, 2014, 8:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading