माध्यमिक शाळांना आठवीचा वर्ग जोडू नका !

माध्यमिक शाळांना आठवीचा वर्ग जोडू नका !

  • Share this:

8th_class_issiue24 मे : शिक्षण हक्क कायद्यानुसार शासकीय माध्यमिक शाळांना 8 वीचा वर्ग जोडण्यात येणार आहे. पण, खाजगी शाळांच्या महामंडळाने याला विरोध केला आहे. दहावीला येणार्‍या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया आणि दर्जा त्यामुळे घसरण्याचा धोका महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाने व्यक्त केला आहे.

राज्य सरकारने हा जीआर मागे घ्यावा अशी त्यांची मागणी आहे. राज्यात चौथीपर्यंत प्राथमिक आणि 7 वी पर्यंत माध्यमिक अशी रचना आहे. पण, आता प्राथमिक शाळांना पाचवीचा वर्ग तर माध्यमिक शाळांना 8वीचा वर्ग जोडण्यात येणार आहे.

त्यामुळे शिक्षणाचा दर्जा अधिक घसरणार असल्याचं खाजगी शाळांचं म्हणणं आहे. शासनाच्या या निर्णयानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना 8 वीचा वर्ग जोडण्यात येणार आहे.

First published: May 24, 2014, 7:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading