नागपूरमध्ये लिफ्टला आग लागून 5 जणांचा मृत्यू

नागपूरमध्ये लिफ्टला आग लागून 5 जणांचा मृत्यू

  • Share this:

nagpur fire23 मे :   नागपूरच्या गोकुळपेठ परिसरात इमारतीच्या लिफ्टमध्ये आग लागून 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

गोकुळपेठ परिसरातल्या अजिंक्य इमारतीच्या लिफ्टला आग लागली आणि त्यात होरपळून एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा मृत्यू झाला. सलीला प्रकाश शिरीया (65), रागिणी विशाल शिरीया (35), विराट निशांत शिरीया (3) श्रुती श्रीकांत माळी (30) सहाना श्रीकांत माळी (अडीच वर्षे) अशी या पाच जणांची नावं आहेत. या बिल्डिंगच्या पार्किंगमधल्या गाड्यांना आग लागली होती तीच आग लिफ्टपर्यंत गेली असावी असा संशय व्यक्त करण्यात येतं आहे.

First published: May 23, 2014, 10:15 AM IST

ताज्या बातम्या