निवडणुकीतल्या दारूण पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची चिंतन बैठक

निवडणुकीतल्या दारूण पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची चिंतन बैठक

  • Share this:

prithviraj and sharad pawar

23 मे : लोकसभा निवडणूकीतल्या पराभवाच्या धक्क्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या जोरदार विचारमंथन सुरू आहे. पराभवाचा आढावा घेण्यासाठी आज मुंबईतल्या टिळक भवनमध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. आजची बैठक ही मुंबईच्या मतदारसंघातील उमेदवारांच्या पराभवावर चिंतन करण्यासाठी आहे अशी माहिती मिळते.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर आणि मुंबईतले काँग्रेसचे उमेदवार आजच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची आज पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीला पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी, आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर इथं दुपारी 2 वाजता ही बैठक सुरू होणार असल्याचे समजते. शरद पवार आणि अजित पवार या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान, मुंबईतल्या मतदारसंघांचा आढावा आज घेतला जाणार नाही अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिलीये. नारायण राणे नाराज नाहीत असं ते म्हणालेत.

First published: May 23, 2014, 12:35 PM IST

ताज्या बातम्या