23 मे : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी भारतात येणार असल्याची माहिती IBN नेटवर्कला मिळाली आहे. सोमवारी हा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यासाठी मोदींनी सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण दिलं आहे. याविषयीची अधिकृत भूमिका पाकिस्तान सरकारकडून आज सकाळीच जाहीर करण्यात येईल.
गेल्या दोन वर्षांमध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे संबंध ताणले गेलेत, त्या पार्श्वभूमीवर नवाझ शरीफ मोदींच्या आमंत्रणाचा स्वीकार करतात की नाही याविषयी उत्सुकता आहे. त्यातच शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ गटामध्येच यावरून दोन गट पडले होते.
शरीफ भारतभेटीवर आल्यास पाकिस्तानातले मुल्ला मौलवी आणि मूलतत्ववादी गट नाराज होतील, दुसरीकडे ते आले नाहीत तर, ते आयएसआय आणि सैन्याच्या दबावापुढे झुकले असा संदेश जगात जाईल अशा कात्रीत ते सापडले होते. अखेरीस सर्व सल्लागारांचा सल्ला झुंगारून त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. मात्र, त्यांचं वेळापत्रक निश्चित झालेलं नाही. ते थोडाच वेळासाठी भारतात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.
मोदींचे पाहुणे : तीन हजार मान्यवरांना निमंत्रण
राजकीय परदेशी पाहुणे
राजकीय पाहुणे
बॉलिवूडचे पाहुणे
Follow @ibnlokmattv |