'आदर्श' पुनर्वसन,फाटक आणि व्यास सेवेत रुजू

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 20, 2014 11:12 PM IST

Image img_195382_fatakadarshscam_240x180.jpg20 मे: आदर्श सोसायटी घोटाळ्यातील आरोपी जयराज फाटक आणि प्रदीप व्यास या दोघा आयएएस अधिकार्‍यांचं निलंबन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मागे घेतलंय. हे दोन्ही अधिकारी सोमवारपासून राज्याच्या प्रशासकीय सेवेत पुन्हा रुजू झाले आहेत.

जयराज फाटक यांच्यावर तत्कालीन मुंबई महापालिका आयुक्त म्हणून नियमबाह्यपणे आदर्शची उंची वाढवल्याचा आरोप आहे. तर प्रदीप व्यास यांच्यावर तत्कालीन जिल्हाधिकारी असताना आदर्शला नियमबाह्यपणे जमीन देण्याचा आरोप आहे.

हे आरोप ठेवून सीबीआयने दोघांनाही अटक केली होती. त्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. पण राज्य सरकारने केंद्र सरकारची परवानगी न घेतल्याने दोन वर्षानंतर एखाद्या आयएएस अधिकार्‍याचे निलंबन कायम ठेवता येत नाही. त्यामुळे या दोघांचंही निलंबन मुख्यमंत्र्यांनी सोमवारी मागे घेतलं. यासाठी मुख्यमंत्र्यांवर आयएएस लॉबीकडून प्रचंड दबाव आल्याची चर्चा आहे. मात्र, जयराज फाटक आणि प्रदीप व्यास यांचं निलंबन अखिल भारतीय सेवेच्या नियमांना धरुन मागे घेतलं. पण त्यांची नियुक्ती अशा ठिकाणी केली जाईल, ज्याचा आदर्श प्रकरणाच्या चौकशीवर परिणाम होणार नाही अस स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं.

Loading...

फायलीत 'आदर्श'बंद?

  • - घोटाळ्यातल्या सरकारी अधिकार्‍यांच्या विरोधातली विभागीय चौकशी ठप्प
  • - आयएएस अधिकारी जयराज फाटक आणि प्रदीप व्यास यांचे निलंबन मागे, दोघेही पुन्हा सेवेत रुजू
  • - कामावर असलेले आयएएस अधिकारी सुद्धा सहीसलामत
  • - अनेक राजकारण्यांचे वादग्रस्त फ्लॅटस कायम
  • - न्यायालयीन अहवालातला राजकारण्यांवरचा ठपका राज्य सरकारनं अमान्य केला
  • - अशोक चव्हाण सहीसलामत, त्यांच्या विरुद्ध खटला चालवण्यास राज्यपालांचा नकार
  • - अशोक चव्हाण यांचे नाव चार्जशीट मधून काढण्याची सीबीआयची कोर्टाला विनंती
  • - अशोक चव्हाण आता लोकसभेचे खासदार, त्यांच्या पुनर्वसनाची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2014 11:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...