कोल्हापुरात कोणत्याही क्षणी टोल वसुली

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 19, 2014 11:08 PM IST

kolhapur toll update19 मे : कोल्हापूर शहरात आता कोणत्याही क्षणी टोलवसुलीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे टोलविरोधी आंदोलन पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. येत्या 9 जून रोजी टोलवरिोधी कृती समितीने टोलविरोधात महामोर्चाचं आयोजन केलंय.

त्यातच सर्वोच्च न्यायालयाने टोलवरची स्थगिती उठवल्यावर आता आयआरबी कंपनीने टोलवसुलीसाठी पोलीस बंदोबस्त पुरवण्याची मागणी केलीय. त्यामुळे शहरात आता टोलवसुलीची शक्यता आहे.

दरम्यान, टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांना गेल्या 2 दिवसांपासून मोबाईलवरुन जीवे मारण्याची धमकी आलीय. त्यामुळे टोलविरोधी कृती समिती आक्रमक झालीय. याबाबत जुना राजवाडा पोलिसांत तक्रारही देण्यात आलीय. प्राथमिक तपासात ही धमकी उत्तर प्रदेशातून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर पोलिसांच्या तपासानंतरच याबाबत स्पष्ट माहिती समोर येणार आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2014 11:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...