Elec-widget

जागतिक हवामानावर 'एल निनो'चे संकट ?

  • Share this:

Image img_237042_rain5_240x180.jpg11 मे : गेल्या काही महिन्यांपासून राज्याला गारपीट आणि अवकाळी पावसासारख्या संकटाला तोंड द्यावं लागलंय. त्यात आता अति उष्णता आणि पावसाळ्यात कमी पाऊस यांची भर पडण्याची भीती आहे. या वर्षी जगभरात हवामानावर एल निनोचा परिणाम होण्याची 80 टक्के शक्यता आहे, असं भाकित अमेरिकी शास्त्रज्ञांनी वर्तवलंय.

प्रशांत महासागरात पृष्ठभागावरच्या पाण्याचं तापमान वाढण्याचा प्रकार एल निनो म्हणून ओळखला जातो. याचा फरक भारताच्या मान्सूनवरही होणार आहे. एल निनोचा परिणाम या अगोदर 1997 साली वाढला होता.

एल निनोमुळे हवामानात बदल होऊन काही ठिकाणी दुष्काळ पडतो तर काही ठिकाणी पूर येतात. जर याचा परिणाम झाला तर यंदा भारतासह, ऑस्ट्रेलिया, आग्नेय आशिया आणि आफ्रिेकवर दुष्काळाचं संकट ओढावू शकतं अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 11, 2014 10:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...