नाशिकमध्ये कुख्यात गुंड भीम पगारेची हत्या

नाशिकमध्ये कुख्यात गुंड भीम पगारेची हत्या

  • Share this:

kolhapur crime10 मे : नाशिकच्या मल्हारखान इथला कुख्यात गुंड भीम पगारे याची राजीवनगर इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रात्री 11.30 च्या सुमारास भीम पगारे राजीवनगर इथून दुचाकीवरुन जात असताना मागून आलेल्या 4 जणांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

यात तो जखमी झाला. जखमी अवस्थेत तो जवळ असलेल्या जय गणराज अपार्टमेंटमध्ये लपून बसला असता मागून आलेल्या मारेकर्‍यांनी त्याच्यावर 4 गोळ्या झाडल्या आणि धारदार शस्त्राने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला.

त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. भीमा पगारेवर नाशिकच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात खंडणी, खुनाचा प्रयत्न यासारखे गुन्हे दाखल आहेत. या घटनेचा इंदिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

First published: May 10, 2014, 8:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading