जय हरी विठ्ठल, विठुरायाच्या पूजेसाठी जात-पात नष्ट !

  • Share this:

vithal 4308 मे : गोरगरिबांचा आणि सर्वसामान्यांचा देव असलेला विठुराया आता खरोखरच बडवे आणि उत्पातांच्या जोखडातून मुक्त झालाय. पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

पुजाविधी येणार्‍या कुठल्याही जातीतल्या स्त्री-पुरुषाला आता विठ्ठलाचे पुजारी होण्याचा अधिकार मिळालाय. यात कोणत्याही जाती-धर्माचा निर्बंध ठेवण्यात आलेला नाही. यापूर्वी सानेगुरुजींनी विठ्ठल मंदिर सगळ्या जाती- धर्मांसाठी खुलं व्हावं यासाठी आंदोलन केलं होतं. सुप्रीम कोर्टाने 15 जानेवारी रोजी मंदिर ताब्यात घेण्याचा अधिकार सरकारला दिला होता.

त्यानंतर विठ्ठल -रुक्मिणीमातेची पूजा कोणी करायची असा प्रश्न पडला होता. त्याबाबत मंदिर समितीनं बैठक बोलवून हा निर्णय घेतला. येत्या 10 मे रोजी त्या घटनेला 68 वर्षं पूर्ण होतील. त्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने घेतलेल्या निर्णयाने आणखी एक पुढचं पाऊल टाकलंय. निर्णयानंतर मंदिर समितीने वृत्तपत्रात जाहीर निविदा प्रसिद्ध केलंय. आणि हिंदू धर्मातील सर्व जातीच्या  स्त्रीपुरुषांना पूजेसाठी निमंत्रण दिलंय. मानधनावर पुजारी नेमण्याच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होतंय. आचारसंहिता संपल्यावर 18 मे रोजी ही निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2014 10:22 PM IST

ताज्या बातम्या