08 मे : डॉ.नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणाचा तपास कुणाकडे द्यायचा, यावर मुंबई हायकोर्ट उद्या शुक्रवारी निकाल देणार आहे. या प्रकरणी आज (गुरुवारी) हायकोर्टात सुनावणी झाली. या तपासाबाबत पुणे पोलिसांवर कुठल्याही प्रकारचा आरोप नाही, असं सीबीआयने सांगितलंय.
त्यामुळे सीबीआयकडे तपास सोपवण्याची आवश्यकता नाही असं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने हायकोर्टात सादर केलं आहे. तसंच आम्ही दोन आरोपींना अटक केलीय मात्र त्याच्यांविरोधात आम्ही केस उभी करू शकलो नाही, अशी कबुली पुणे पोलिसांनी दिलीय. त्यामुळे या आरोपींना जामीन मिळाला असंही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय.
पण, या प्रकरणाची व्याप्ती इतर राज्यातही पसरलीय, त्यामुळे तपास सीबीआयकडे द्यावा असा युक्तीवाद याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला आहे. मात्र नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आठ महिने पूर्ण झाले आहेत पण अजूनही मारेकरी मोकाटच आहेत.
Follow @ibnlokmattv |