राज्यात अवकाळी पावसामुळे 3 जणांचा मृत्यू

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 8, 2014 11:42 AM IST

राज्यात अवकाळी पावसामुळे 3 जणांचा मृत्यू

avkali paus08 मे :  कालच्या पावसाने बारामती, खेड, चिपळूण, सोलापूर, सिंधुदुर्गमध्ये थैमावमान घातल्यानंतर आता थोडी विश्रांती घेतली आहे. पण रात्री काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. पण या अवकाळी पावसाने सोलापुरात 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्ह्यात काल खालापूर, महाड, रोहा इथे वादळी पाऊस झाला. कर्जत तालुक्यातही वादळी वार्‍यासह पाऊस झाला. या पावसामुळे रोहा तालुक्यात अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि झाडं कोसळली होती तर या पावसामुळे पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतुक दोन तास विस्कळीत झाली होती.

सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी, कणकवली आणि देवगडमध्ये वादळी पाऊस झाला. या पावासाने अनेक झाडं उन्मळून पडली. तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातही वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. उन्हामुळे तापलेल्या वातावरणात आलेल्या पावसामुळे काहीसा थंडावा निर्माण झाला आहे.

कोकण किनारपट्टीवर येत्या 24 तासांत वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाची होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती, पण सध्यातरी इथे पाऊस काही चिन्ह नाही आहेत. पण कालच्या या अवकाळी पावसाने आंबा आणि काजू बागांचं नुकसान झालेल आहे. हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सोलापूरमध्ये वादळीवार्‍यामुळे तुटलेल्या विजेच्या तारा अंगावर पडल्याने पंढरपूर तालुक्यातील बादलकोट इथ एका दांम्पत्याचा तर वीज अंगावर पडल्यान सांगोला तालुक्यातील घाणेगाव इथल्या रामलिंग बचुटे यांचा मृत्यू झाला.तरा सांगोला तालुक्यातील डोंगरगाव येथील 15 घरांवरील पत्रे उडून घरांची पडझड झाली. अवकाळी पावसांने पंढरपूर आणि सांगोला तालुक्यात जास्त नुकसान झालय.आत्ता पाऊस थांबला असला तरीही वातावरणात गारवा आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2014 10:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...