पालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार उद्या सेवेत परतणार

पालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार उद्या सेवेत परतणार

  • Share this:

gudewar07 मे :  सोलापूरचे महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार पुन्हा एकदा सोलापूरच्या महापालिका आयुक्तपदाचा चार्ज घेणार आहेत. प्रधान सचिवांशी चर्चा केल्यानंतर आपण हा निर्णय घेतला, असं गुडेवार यांनी आयबीएन लोकमतला सांगितलं. सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याशीही आपली चर्चा झाली, असंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेसच्या नगरसेवकांच्या दादागिरीमुळे गुडेवार यांनी बदलीची मागणी केली होती. सोलापूरमध्ये गुडेवार यांच्या समर्थनासाठी आज सोलापूर बंदची हाक दिली होती, त्याशिवाय त्यांना पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी आंदोलनही केलं होतं. सोलापूरकरांच्या प्रेमामुळे मी भारावलो आणि सोलापूरवासियांसाठी परतण्याचा निर्णय घेतला, असंही गुडेवार यांनी म्हटलं आहे.

सोलापूरमध्ये सध्या पाणी प्रश्नावरून महापालिकेत सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेवकांची गुंडगिरी सुरु आहे. सोलापूरात दर तीन दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्याऐवजी दोन दिवासाआड पाणीपुरवठा करण्यासाठी काँग्रेस नगरसेवकांनी दमदाटी केली होती. पाणीपुरवठा शक्य नसल्यास आयुक्तपद सोडण्यासाठीही दबाव आणला होता. अखेर गुडेवारांनी बदलीची मागणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2014 01:29 PM IST

ताज्या बातम्या