भारताचा न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक विजय : वेलिंग्टन टेस्ट ड्रॉ

7 एप्रिल, वेलिंगटन वेलिंग्टन टेस्ट अखेर पावसामुळे ड्रॉ झाली पण भारताने न्यूझीलंड विरूद्धची तीन टेस्टची सीरिज एक - शून्यने जिंकली. तब्बल 41 वर्षांनी भारतीय टीमने न्यूझीलंडमध्ये सीरिज जिंकली आहे. न्यूझीलंड टीमचा स्कोअर आठ विकेटवर 281 रन्स असताना पावसाला सुरुवात झाली आणि पावसाची संततधार त्यानंतर सुरूच राहिली. त्याचबरोबर ढगाळ वातावरणामुळे प्रकाशही अपुरा होता. अखेर भारतीय वेळेनुसार दहा वाजता टेस्ट ड्रॉ करण्याचा निर्णय घ्यावा लागला. भारतीय टीमच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास पावसाने हरावून घेतला. त्यापूर्वी रॉस टेलरचा अपवाद वगळता न्यूझीलंडचा एकही बॅट्समन आज पीचवर टिकू शकला नाही. टेलरने एकाकी झुंज देत सेंच्युरी ठोकली. भारतातर्फे दुसर्‍या इनिंगमध्ये हरभजनसिंगने चार तर झहीर, तेंडुलकरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या सीरिजमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणार्‍या गौतम गंभीरला मॅन ऑफ द सीरिज बरोबरच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Apr 7, 2009 05:49 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2009 05:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...