दलितांवरील अत्याचार थांबणार कधी?

दलितांवरील अत्याचार थांबणार कधी?

  • Share this:

45dalit06 मे : राकट देशा दणकट देशा, अत्याचार देशा महाराष्ट्र देशा असं म्हणण्याची वेळ आलीय. लोकशाहीची अब्रु राज्यात वेशीवर टांगली जात आहे. राज्यभरात ठिकठिकाणी दलितांवरील अत्याचाराच्या घटना घडतच आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातल्या खर्डा गावात नितीन आगे या तरुणाने सवर्ण तरुणीशी प्रेमप्रकरणातून 28 एप्रिलला अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. पण या घटनेनंतरही राज्यात दलितांवरील अत्याचार सुरूच आहे.

जालना, औरंगाबादमध्ये दलितांवर अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. जालन्यात मनोज कसाब या दलित सरपंचाचा खून करण्यात आलाय. तर औरंगाबादमध्ये उमेश आवळे नावाच्या मातंग तरूणाचा खून करून विहिरीत फेकून देण्यात आल्याचं उघडकीला आलंय.

जालन्यात दलित सरपंचाची हत्या

जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात नानेगावचे दलित सरपंच मनोज कसाब यांची हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणातल्या 3 फरारी आरोपींना आता अटक करण्यात आली आहे. नानेगावचा माजी सरपंच गणेश चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी 3 एप्रिलला मनोजला मारहाण केली होती. त्यानंतर काल सोमवारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात एकूण 11 आरोपी होते, त्यापैकी फक्त आठच आरोपींना अटक झाली होती. आज फरार तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. मनोज कसाब हा चार वर्षांपासून आरक्षणातून सरपंच झाला होता. त्यानंतर त्यानं विकासाच्या अनेक योजना राबवल्या होत्या. त्याचं काम गावचा माजी सरपंच गणेश चव्हाण यांना खुपत होतं. त्याचा राग मनात धरूनच त्यांच्या कार्यकर्त्यांनी महिन्याभरापूर्वी मनोजवर हल्ला केला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

कन्नडमध्ये तरुणाची हत्या

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातला पिशोरच्या देवपुळ गावात उमेश आवळे नावाच्या मातंग तरुणाचा खून करून विहिरीत फेकून देण्यात आलं होतं. ही घटना 25 एप्रिलची आहे. या प्रकरणी उच्च जातीय आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर आता दलितांवर दबाव निर्माण करण्यासाठी दलित वस्तीचा पाणीपुरवठा तोडण्यात आल्याचा आरोप पीडितांनी केलाय. इतकंच नाही तर हे पैसे घेऊन तुम्ही गप्प बसा असं म्हणत प्रकरण दाबण्याचा पोलिसांकडून प्रयत्न होतोय, असा नातेवाईकांचा आरोप आहे.

 

उमेशची अंत्ययात्रा लवकर काढण्यासाठी मारहाण केल्याचं उमेशच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. पण पिशोरचे पोलीस निरिक्षक प्रफुल्ल अंकुशवार यांनी जाणीवपूर्वक आरोपींना अटक केलेली नाही. उमेशचा मृत्यू डोक्याला जखम झाल्याने झाल्याचं शवविच्छेदन करणार्‍या डॉक्टरांनी सांगितलंय. तसा प्राथमिक रिपोर्टही त्यांनी दिलाय. मात्र पोलीस रिपोर्ट मिळाला नसल्याचे सांगत आहेत. एकंदरीत आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंदवला असूनही का अटक होत नाही आणि पोलीस पीएम रिपोर्ट का दडवून ठेवत आहेत. यामुळे पोलीस प्रकरण पैसे घेऊन दाबण्याची धमकी देत आहेत या उमेशच्या नातेवाईकांच्या आरोपाला पुष्टी मिळतेय.

ऍट्रॉसिटीच्या खटल्यांसाठी 6 फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करणार - गृहमंत्री

राज्यात ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी मान्य केलंय. ऍट्रोसिटीची प्रकरणं जास्त असलेल्या जिल्ह्यांत अधिक फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करणार असं सांगत राज्यात ऍट्रॉसिटीच्या खटल्यांसाठी 6 फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करणार असल्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली. आर. आर. पाटलांनी यांनी अहमदनर जिल्ह्यातल्या नितीन आगेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. नितीन आगे प्रकरणासारखी घटना घडणं दुर्देवी आहे अशी खंतही आबांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2014 02:20 PM IST

ताज्या बातम्या