नागपूरमध्ये दहशतीचं वातावरण, गेल्या 24 तासांमध्ये 4 खून

  • Share this:

crime scene05 मे : नागपूर शहरात खुनांचे सत्र सुरूच आहे. गेल्या 24 तासांत चार जणांचे खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. MIDC परिसरात क्षुल्लक कारणावरून पतीने अपल्या पत्नीवर कुर्‍हाडीने वार करून तिची हत्या केल्याची घटना घडली. तर अजनीत पैशाच्या वादातून एका प्रॉपर्टी डिलरची हत्या करण्यात आली आहे.

सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर नीलेश नावाच्या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. पत्नीच्या हत्या प्रकरणी आरोपी अब्गुल सहीद शेख वहीद शेख याला अटक करण्यात आली आहे. तर प्रॉपर्टी डिलरच्या हत्या प्रकरणी सत्येंद्र टॅामीला अटक करण्यात आली आहे.

नागपूरात गेल्या आठ दिवसात नऊ जणांचे खून झाले आहे. शहरात आणखी किती खून होणार असा प्रश्न पडला असून नागपूर मध्ये नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2014 12:14 PM IST

ताज्या बातम्या