News18 Lokmat

दिवा - सावंतवाडी पॅसेंजरला अपघात, 22 जणांचा मृत्यू

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 5, 2014 02:10 PM IST

दिवा - सावंतवाडी पॅसेंजरला अपघात, 22 जणांचा मृत्यू

5509325570669235148_Org04 मे : रायगड जिल्ह्यातल्या नागोठाण्याजवळ एका पॅसेंजर ट्रेनला झालेल्या अपघातात 22 जण ठार तर 169 जण जखमी झालेत. मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाहीर केली आहे.

दिव्यावरून ही गाडी सकाळी सहा वाजता सावंतवाडीसाठी रवाना झाली होती. नागोठणेजवळील भिसेखिंड येथील बोगदा ओंलाडल्यावर इंजिनसह गाडीचे 4 डबे रुळावरुन घसरले.

उन्हाळी सुट्टी सुरु असल्याने पॅसेंजरमध्ये प्रवाशांची संख्या जास्त होती. घसरलेले डबे हटविण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. मा‍त्र या कामाला किती कालावधी लागेल, याबाबत समजू शकले नाही. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु  असून, सुमारे 50 ऍंम्बुलन्स घटनास्थळी आहेत. जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गृहमंत्री आर आर पाटीलही काहीवेळापूर्वीच घटनास्थळी दाखल झाले आहेत. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील तटकरेही घटनास्थळी पोहोचले आहेत. रुळ तुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कुर्ला आणि कल्याणवरून एकेक ऍक्सिडेंट रिलीफ ट्रेन घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघाताची चौकशी केली जाईल असं रेल्वे बोर्डाचे चेअरमन अरुणेंद्र कुमार यांनी सांगितलं आहे.

या अपघाताबद्दल कोणतीही मिळवण्यासाठी संपर्क साधा या हेल्पलाईनवर

Loading...

-हेल्पलाईन क्रमांक

 • पनवेल- 27468833
 • रत्नागिरी- 02352-228176 / 228951 / 228954
 • बेलापूर सीबीडी- 022-27561721 / 23 / 24

या अपघातामुळे कोकण रेल्वेची वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे.

मार्ग बदललेल्या गाड्या

अप ट्रेन्स

 • 12134 - मेंगलोर जंक्शन-सीएसटीएम एक्सप्रेस
 • 12620 - मेंगलोर-एलटीटी -मत्सगंधा एक्सप्रेस

डाऊन ट्रेन्स

 • 12618 - निझामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस जी काल (03 मे) ला सुटली आहे
 • 10103 - सीएसटीएम -मडगाव- मांडवी एक्सप्रेस जी आज सकाळी सीएसटीएम वरुन सुटली आहे
 • 16 345 - एलटीटी-त्रिवेंद्रम नेत्रावती एक्सप्रेस
 • 19578 - हापा-तिरुनवेली एक्सप्रेस जी काल (03 मे) सुटली आहे
 • 12619 - एलटीटी-मेंगलोर मत्स्यगंधा एक्सप्रेस
 • 12284 - निझामुद्दीन -एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस जी काल निजामुद्दीनहून सुटली होती.
 • 01003 - दादर-सावंतवाडी हॉलिडे स्पेशल
 • 22150 - पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेस
 • 12742 - पटना-वास्को एक्सप्रेस जी काल (03 मे) सुटली आहे
 • 19260 - भावनगर -कोचुवेल्ली एक्सप्रेस जी आज (04 मे) ला सकाळी सुटली आहे
 • 12133 - सीएसटीएम -मेंगलोर जंक्शन एक्सप्रेस

 

कोकण रेल्वेच्या आजच्या रद्द झालेल्या ट्रेन्स

अप ट्रेन्स

 • 10112 - मडगाव- सीएसटीएम कोकणकन्या एक्सप्रेस
 • 11004 - सावंतवाडी-दादर राज्यराणी एक्सप्रेस

डाऊन ट्रेन्स

 • 10111 - सीएसटीएम-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस
 • 11003 - दादर-सावंतवाडी राज्यराणी एक्सप्रेस

कोकण रेल्वेचे भीषण अपघात

 • जून 2002- वैभववाडीजवळ बेर्ले बोगद्याजवळ रेल्वेवर दरड कोसळून अपघात
 • कोकण रेल्वे मार्गावरचा सगळ्यात पहिला आणि मोठा अपघात
 • अपघातातल्या मृतांची संख्या 58
 • 16 जून 2004 मत्स्यगंधा एक्सप्रेसला महाडजवळ अपघात, 15 ठार, 38 जखमी
 • जुलै 2012 - रत्नागिरीत पोमेंडीजवळ दरड कोसळून अपघात
 • ऑक्टोबर 2013 - खेड स्टेशनजवळ कोकणकन्या एक्सप्रेसचे इंजिन घसरले
 • 11 एप्रिल 2014 -अडवली- निवसर दरम्यान मालगाडी घसरली
 • 14 एप्रिल 2014 -उक्शी स्टेशनजवळ विल्हेवाडी बोगद्याजवळ मालगाडीचे पाच डबे घसरले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 4, 2014 12:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...