अखेर गावकर्‍यांनी दलितांवरचा बहिष्कार हटवला

अखेर गावकर्‍यांनी दलितांवरचा बहिष्कार हटवला

  • Share this:

55ibnlimpact_buldhana_news03 मे : अखेर बुलडाण्यामधील मलकापूर तालुक्यातील बेलाड गावातील दलितांवर बहिष्कार उठवण्यात आला आहे. समाजमंदिर आणि झेंड्यावरुन झालेल्या वादातून गावकर्‍यांनी दलितांना वाळीत टाकलं होतं.

त्यानंतर नुकत्याच लोकसभा निवडणुकीत गावातील 550 दलितांनीही मतदानावर बहिष्कार घातला होता. आयबीएन लोकमतने ही बातमी प्रसिद्ध केली होती. अखेर आयबीएनच्या बातमीची दखल घेत रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सी.एल.थूल यांनी आज (शनिवारी) बेलाड गावाला भेट दिली.

त्यात दलित वस्तीसह गावच्या इतर समाजाशी राऊत आणि थूल यांनी चर्चा केली. या भेटीदरम्यान दलितांवरचा बहिष्कार मागे घेत असल्याचं गावकर्‍यांनी जाहीर केलं. सामाजिक सभागृहाच्या मुद्द्यावर 7 दिवसांत तोडगा काढला जाणार आहे असंही कळतंय. इतकंच नव्हे तर हा वाद आपापसांत मिटवून टाकू असं आश्वासन सरपंच आणि दोन्ही समाजातील नागरिकांनी मंत्र्यांना दिलं आहे. बहिष्कारासारख्या घटना दुर्देवी असून अशा घटना घडत राहिल्या तर राज्य सरकार कठोर कारावाई करेल. वेळ पडल्यास ग्रामपंचायतीचा विकास निधी थांबवला जाईल किंवा ग्रामपंचायत बरखास्तही केली जाईल असा इशारा नितीन राऊत यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2014 08:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading