मुख्यमंत्री कोट्यातले दोन फ्लॅट परत घेऊन गुन्हे दाखल करा !

मुख्यमंत्री कोट्यातले दोन फ्लॅट परत घेऊन गुन्हे दाखल करा !

  • Share this:

dg55mumbai_High-Court02 मे : मुख्यमंत्री कोट्यातून दोन फ्लॅट्स घेतलेल्या लाभार्थ्यांना हायकोर्टाने दणका दिलाय. ज्यांनी ज्यांनी या कोट्यातून दोनदोन फ्लॅट घेतले आहेत ते त्यांच्याकडून परत घ्या, असं आदेश कोर्टाने दिले आहेत.

मुख्यमंत्री कोट्यातून दोन फ्लॅट मिळवलेले मंत्री, आमदार, पत्रकार, कलाकार यामुळे अडचणीत आले आहेत. अशा लाभाथीर्ंवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. या फ्लॅटवाटपातल्या गैरप्रकारांबद्दल केतन तिरोडकर यांनी याचिका दाखल केलीय. मुंबईत सुमारे 200 ते 250 फ्लॅट राजकारण्यांनी लाटले आहेत. तर राज्यभरात अशा लाभाथीर्ंची संख्या 700 च्या घरात आहे.

मुख्यमंत्री कोट्यातील गैर प्रकाराबाबत केतन तिरोडकर यांनी मुंबई हायकोर्टात क्रिमिनल रिट पिटीशन दाखल केलं होतं. त्यावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने दोन महत्वाचे आदेश दिलेत. मुख्यमंत्री कोट्याचा गैरवापर करण्यात आला आहे. एका राजकीय नेत्याने आपल्या कुटुंबियांसाठी दोन-दोन फ्लॅट घेतले आहेत.

 

मुंबईत सुमारे 200 ते 250 फ्लॅट राजकारण्यांनी लाटले आहेत. तर राज्यभरात अशा प्रकारे 700 च्या आसपास फ्लॅट राजकारण्यांनी लाटले आहेत. अशा फ्लॅटधारकांवर कारवाई करावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत,अशी मागणी याचिकेत केली होती. त्यावर आज हायकोर्टाने आदेश दिलेत. ज्या राजकारण्यांनी मुख्यमंत्री कोर्टातून दोन घरं लाटली आहेत दोन्ही जप्त करावी,असे आदेशही दिलेत. तसंच ओशिवरा येथे आशिर्वाद आणि इतर सोसायटीत ज्या राजकारण्यांनी फ्लॅट घेतले त्यांचे फ्लॅट जप्त करावेत तसंच त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावे, असे आदेश ही कोर्टाने दिले आहेत.

First published: May 2, 2014, 10:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading