News18 Lokmat

मोदींना विरोध करण्यासाठी जेडीयूचा 'आप'ला पाठिंबा

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 2, 2014 11:31 AM IST

मोदींना विरोध करण्यासाठी जेडीयूचा 'आप'ला पाठिंबा

jdu_kejriwal01 मे : वाराणसीच्या रणसंग्रमात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा रथ रोखण्यासाठी एकमेकांशी हातमिळवणी केली जात आहे. वाराणसीत संयुक्त जनता दलाने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा जाहीर केलाय. नरेंद्र मोदींना विरोध करण्यासाठी जेडीयूने केजरीवाल यांना पाठिंबा दिला असल्याचं जेडीयूचे नेते के.सी.त्यागी यांनी स्पष्ट केलं. एवढंच नाही तर जेडीयू केजरीवाल यांचा प्रचारही करणार आहे.

विशेष म्हणजे भाजपने नरेंद्र मोदी यांचं नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर केलं तेव्हा जेडीयूने भाजपसोबतची युती तोडली होती. बिहारमध्ये नितीशकुमार सरकारने भाजपसोबत फारकत घेतली होती. आता जेडीयूने मोदींना विरोध करणार्‍या पक्षाला पाठिंबा देण्याची रणनीती आखली आहे.

पण जेडीयूला याचा फायदा वाराणसीत कमी होईल असा कल आहे. कारण वाराणसीत जेडीयूचा प्रभाव नगण्य आहे. वाराणसी हे उत्तरप्रदेशला लागून शहर आहे. वाराणसीत जरी जेडीयूला फायदा झाला नाही तरी आपल्या मतदारसंघात योग्य निरोप दिला जाईल असा विश्वास जेडीयूला वाटतो. विशेष म्हणजे दोनदिवसांपूर्वी कौमी जनता दलाचे नेते मुख्तार अन्सारी यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलाय. कौमी दलाच्या पाठिंब्यामुळे मोदींना अडथळा येण्याची शक्यता आहे.

Loading...

त्यातच आता जेडीयूने आपला पाठिंबा जाहीर केलाय. दरम्यान, जेडीयूच्या पाठिंब्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी ट्विट वरुन मोदींवर टीका केलीय. मोदी म्हणतात 5 मेपासून वाराणसीत 5 दिवस प्रचार करणार आहेत. त्यांनी बडोद्यात प्रचार केला नाही. मग काशीत इतके दिवस का? घाबरलात का? असा टोला केजरीवाल यांनी लगावलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 1, 2014 04:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...